एक्स्प्लोर

खादी ग्रामोद्योग आयोगाला ट्रेडमार्क कायद्यानुसार हायकोर्टाचा दिलासा; मुंबईतील संघटनेला 'खादी' हे नाव, 'चरखा' हे चिन्ह वापरण्यास मनाई

Mumbai News: खादी ग्रामोद्योग आयोगाला ट्रेडमार्क कायद्यानुसार हायकोर्टाचा दिलासा. मुंबईतील संघटनेला 'खादी' हे नाव आणि 'चरखा' हे चिन्ह वापरण्यास हायकोर्टाची मनाई.

Mumbai News: खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचं (Khadi and Village Industries Commission) 'खादी' (Khadi) हा शब्द आणि 'चरखा' (Charkha) या नोंदणीकृत व्यापरचिन्हाचा ट्रेडमार्क (Trademark) कायद्यानुसार, तुर्तास वापर न करण्याचे आदेश मुंबई ग्रामोद्योग संघटनेला (Mumbai Village Industries Association) हायकोर्टानं (Bombay High Court) दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे खादी ग्रामोद्योगला काहिसा दिलासा मिळालेला आहे.

नोंदणीकृत असलेला 'खादी' हा शब्द आणि 'चरखा' या लोगोचा मुंबई खादी आणि ग्रामोद्योग संघटना व्यापारासाठी वापर करत असल्याचा दावा करत आयोगानं मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court News) याचिका केली आहे. साल 2021 मध्ये ही बाब लक्षात येताच त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. आपल्या नोंदणीकृत शब्द आणि चिन्हाचं उल्लंघन झाल्याचा दावा आयोगानं या याचिकेतून केला आहे. याआधी प्रतिवादी संघटनेनं केव्हीआयसीच्या प्रमाणपत्राशिवाय खादी चिन्हाचा वापर करून उत्पादन विकणार नाही, अशी हमी न्यायालयात दिल्यानंतर आयोगानं दाखल केलेला सूट मागे घेतला होता. मात्र, प्रतिवादी संघटना त्यानंतरही ट्रेडमार्क कायद्याचं उल्लंघन करत असून न्यायालयाला दिलेल्या आश्वासनाचं उल्लंघन करत असल्याचा दावाही या याचिकेतून करण्यात आला आहे. न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्यासमोर यावर नुकतीच सुनावणी पार पडली.

मुंबई खादी संघटनेनं आयोगाकडेनं आपली 'खादी' उत्पादनं विकण्याकरता आवश्यक प्रमाणपत्र मिळवलं होतं. मात्र, प्रतिवादीकडून विकल्या जाणाऱ्या कापड्यांत खादीचं नसल्याच्या तक्रारी मिळू लागल्यामुळे प्रतिवादी संघटनेला देण्यात आलेलं प्रमाणपत्र मागे घेण्यात आलं. मात्र त्यानंतरही संघटनेनं खादीचं नाव आणि ट्रेडमार्क वापरत आपल्या उत्पादनांची विक्री सुरूच ठेवली. त्यामुळे आयोगाला पुन्हा एकदा न्यायालयात धाव घ्यावी लागल्याचं त्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलं. खादी हा शब्द, लेबलवरचं चिन्हांची अधिकृतरीत्या नोंदणी करण्यात आली आहे. मुंबई खादी संघटना वापरत असलेलं हे चिन्ह आयोगाच्या नोंदणीकृत चिन्हासारखंच असल्यानं इथं ट्रेडमार्क कायद्याचं उल्लंघन केल्याचं स्पष्ट होतय, त्यामुळे प्रतिवाद्यांना वेळीच न रोखल्यास खादा ग्रामोद्योग आयोगाचं कधीही भरून न येणारं नुकसान होईल असं निरिक्षण हायकोर्टानं नोंदवलं. त्यामुळे ट्रेडमार्क कायद्याच्या कलम 34 नुसार याचिकाकर्त्यांना अंतरिम दिलासा देत हायकोर्टानं या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती फेटाळून लावली.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Dharavi Redevelopment Project: धारावी पुनर्विकास प्रकल्पाला हायकोर्टात आव्हान; 'सेकलिंक' कंपनीची याचिका, राज्य सरकारच्या हेतूवर आक्षेप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget