Helmet For Pillion Riders : मुंबईत टूव्हीलरवरील दोघांनाही हेल्मेट सक्ती; पंधरा दिवसांनंतर होणार दंड आकारणी
Helmet For Pillion Riders : अनेक वेळेस दुचाकीस्वाराच्या मागे बसलेली व्यक्ती सुद्धा हेल्मेटचा वापर करत नाहीत. अशा लोकांसाठी आता हेल्मेट घालणं बंधनकारक असणार आहे.
Helmet For Pillion Riders : मुंबई शहरामध्ये अनेक मोटार सायकलस्वार हे विनाहेल्मेट मोटारसायकल चालवितात, तसेच मोटारसायकल चालविणाऱ्याच्या मागे बसलेली व्यक्ती सुद्धा हेल्मेटचा वापर करत नाहीत. अशा लोकांसाठी आता हेल्मेट घालणं बंधनकारक असणार आहे. या संबधित परिपत्रक वाहतूक पोलिस मुख्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. वाचा काय आहेत नियम?
दुचाकीस्वाराच्या मागे बसणाऱ्यांनाही हेल्मेट बंधनकारक
मोटारसायकलस्वार आणि त्याच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्ती यांनी मोटारसायकल चालवित असताना हेल्मेट वापरणे वाहन कायदा 1988 कलम 129 सह 194 (ड) अन्वये बंधनकारक आहे. विना हेल्मेट मोटारसायकल चालविल्यास मोटार वाहन कायद्यामध्ये 500 रुपये दंड तसेच 3 महिन्यांसाठी लायसन्स निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
अन्यथा कारवाईस सामोरे जा..
वाहतूक विभागाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकाव्दारे नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की, मोटार सायकलस्वार आणि त्यांच्या पाठीमागे बसलेली व्यक्ती यांनी हेल्मेट वापरावे अन्यथा येत्या 15 दिवसानंतर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येणार असल्याचं वाहतूक विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
पुढच्या पंधरा दिवसात हेल्मेट वापरणं बंधनकारक
मुंबई वाहतूक पोलिसांनी हा आदेश काढला असून दुचाकीस्वार आणि मागे बसणाऱ्या व्यक्तीला देखील पुढच्या पंधरा दिवसात हेल्मेट वापरणं बंधनकारक असेल, पुढील पंधरा दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असून नियम न पाळणाऱ्यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. दुचाकीस्वाराचा 3 महिन्यांचा परवाना रद्द करण्यात येणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या