एक्स्प्लोर
पालघर, डहाणूमध्ये तुफान पाऊस
पालघर: मंगळवारी पालघर आणि डाहणू परिसरात तुफान पाऊस झाला. सकाळपासून झोडपायला सुरूवात केलेल्या पावसानं अनेक ठिकाणी पाणीच पाणी चोहीकडे अशी स्थिती होती. तसंच मुसळधार पावसामुळे रेल्वेरुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतुकीवरही काहीप्रमाणात परिणाम झालेला होता.
संध्याकाळी पावसानं थोडी उसंत घेतल्याने रेल्वेरुळावरचं पाणी ओसरायला सुरुवात झाली. यानंतर विरार आणि डहाणूदरम्यानची रेल्वेसेवा हळूहळू पूर्वपदावर आली. दरम्यान सखल भागातील वस्त्यांमध्ये अजुनही पाणी शिरलेलं असल्यामुळं स्थानिकांची चांगलीच अडचण झालीय.
पालघर धरण क्षेत्रात गेल्या 36 तासांत 85 मिमीपेक्षा जास्त पाऊस झाली आहे. तर तारापूरमध्ये 260 मिमीपेक्षाही जास्त पावसाची नोंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
क्राईम
Advertisement