Mumbai Rain Updates: हवामान खात्याकडून अचानक नवा अलर्ट, मुंबईचा यलो अलर्ट रेडमध्ये कन्व्हर्ट झाला, अतिमुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain news: मान्सूनचा पाऊस रविवारी तळकोकणातील देवगडमध्ये दाखल झाला होता. आता मुंबई आणि पुण्याला, ठाण्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. 200 मिमी पावसाचा अंदाज

Mumbai Rain news: आजपर्यंतचे सर्व प्रचलित आराखडे मोडत मे महिन्यातच मुंबईसह राज्यात दाखल झालेल्या मान्सूनच्या पहिल्याच पावसाने (Monsoon Rain) मुंबईकरांची दाणादाण उडवली आहे. हवामान खात्याने सोमवारी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा यलो अलर्ट दिला होता. मात्र, सोमवारी दुपारी पावसाचा जोर वाढल्यानंतर मुंबई हवामान प्रादेशिक विभागाकडून आपला अंदाज बदलण्यात आला आहे. नव्या अंदाजानुसार, मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि रायगडमध्ये (Raigad) पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. रेड अलर्ट असलेल्या परिसरात एकाच दिवसात अतिमुसळधार म्हणजे 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. याशिवाय, सातारा आणि घाट परिसर, पुण्यातील घाट परिसर येथेही हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुढील काही तासांमध्ये या सर्व ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. (Maharashtra Rain updates)
दरम्यान, रविवारी कोकणात दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी सोमवारी मुंबईत प्रवेश केला. मान्सूनने मुंबईत दाखल होण्याचा 55 वर्षाचा विक्रम मोडला आहे. यापूर्वी 1956, 1962 आणि 1971 साली मान्सून 29 मे रोजी मुंबईत दाखल झाला होता. मात्र, यंदा मान्सूनने हा विक्रमही मोडीत काढला आहे. एरवी मान्सून मुंबईत 11 जूनच्या आसपास दाखल होतो. परंतु, यंदा मान्सून 16 दिवस आधीच मुंबईत धडकला आहे. मुंबईसह, पुणे आणि सोलापुरात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. पुढील 3 दिवसांत महाराष्ट्रातील आणखी काही भाग मान्सून व्यापणार असल्याचे माहिती हवामान विभागानं दिली आहे.
Mumbai Metro Train: मुंबईतील भुयारी मेट्रोचे पहिल्याच पावसात तीनतेरा
मुंबईतील वरळी परिसरातील भुयारी मेट्रोच्या आचार्य अत्रे चौक स्थानकात पाणी, मेट्रो सेवा बंद, भुयारी मेट्रोकडे जाणारं गेटही बंद करण्यात आले आहे. मुंबईतील महत्त्वकांशी प्रकल्प एक्वा लाइन-3 ला पावसाचा फटका बसला आहे. मुंबईतील आचार्य अत्रे चौक वरळी मेट्रो स्थानकावर पावसाचे पाणी साचले आहे. मेट्रोमधून उतरताच प्रवाशांना तळ्यात उतरल्याचा भास होताना दिसला. मुंबईतील अंडरग्राउंड मेट्रो-3 ही नुकतीच धावू लागली. मात्र मुंबईतील पहिल्याच पावसात भुयारी मेट्रोला याचा फटका बसला आहे.
आणखी वाचा
मुंबईतील भुयारी मेट्रो स्थानकात पाणी घुसलं, Aqua line वर मेट्रोचं दार उघडताच तळ्यात उतरल्याचा भास
मस्जिद बंदर स्थानकात वॉटरपार्कसारखं पाणी भरताच मध्य रेल्वेने बीएमसीवर खापर फोडलं, म्हणाले...
























