एक्स्प्लोर

Gram Panchayat Election : निवडणूक अधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात थेट हायकोर्टात दाद मागता येणार नाही : हायकोर्ट

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल, निवडणूक अधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात थेट हायकोर्टात दाद मागता येणार नाही : हायकोर्ट

मुंबई : निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर निवडणूक अधिकार्‍यांनं नामनिर्देशक पत्रासंबंधी दिलेल्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागता येणार नाही. निवडणुकीनंतर त्याविरोधात केवळ निवडणुक याचिका दाखल करून दाद मागणं अपेक्षित आहे. असा महत्वपूर्ण निर्वाळा बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या त्रिसदस्य पूर्णपिठानं दिला आहे. राज्य निवडणूक आयोगानं सध्या सुमारे 14 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यासंदर्भात 11 डिसेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध करून हा निवडणूक कार्यक्रम जाहिर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निकाल अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातोय.

ग्रामपंचायत निवडणुकींच्या पार्श्‍वभूमीवर ग्रामविकास अधिकार्‍यांकडे खोटी प्रमाणपत्र सादर केल्यानं उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्याच्या निवडणूक अधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात उमेदवाराला थेट हायकोर्टात येण्याचा अधिकार आहे का? यावर हायकोर्टाच्या मुंबई आणि औरंगाबाद खंडपीठात वेगवेगळे निकाल लागल्यानं हे प्रकरण मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती गिरीष कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या त्रिसदस्य पूर्ण पिठाकडे वर्ग करण्यात आलं. सर्व पक्षकारांच्या युक्तीवादानंतर त्रिसदस्य पूर्णपीठाने निवडणीतील उमेदवाराने निवडणूक अधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात केलेली रिट याचिका हायकोर्ट दाखलच करून घेऊ शकत नाही, असा महत्वपूर्ण निर्वाळा दिला आहे.

काय होती याचिका? सोलापूरमधील भोशे ग्रामपंचायतीसाठी काकडे पॅनल व अवताडे पॅनल इच्छुक असून या दोन्ही पॅनलचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यापैकी काकडे पॅनलनं अवताडे पॅनलच्या 14 उमेदवारांविरोधात ग्रामपंचायतीतून बनावट प्रमाणपत्र मिळवल्याचा आरोप करत, हे उमेदवार ठेकेदार असल्याचा तसेच त्यांच्या जवळ शौचालयही नसल्याचा दावा निवडणूक आयोगासमोर केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने अवताडे पॅनलचे 14 उमेदवार बाद ठरवले. याविरोधात अवताडे पॅनलच्या भाग्यश्री गायकवाड व कर्मवीर औताडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

Gram Panchayat Election : निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या, परवा मतदान

या याचिकेवरील सुनावणी दरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर कायद्याच्या कलम 243(ए) नुसार निवडणूक प्रकरणांत हायकोर्टाला हस्तक्षेप करण्याचा अधिकारच नाही, असा मुद्दा उपस्थित झाला होता. याचिकाकर्त्यांनी निवडणुकीपूर्वी खोटी प्रमाणपत्र सादर केल्याच्या मुद्यावर जर निवडणूक अधिकार्‍यांनी उमेदवारी अर्ज अवैध ठरवले तर राज्य घटनेच्या कलम 26 नुसार त्याविरोधात रिट याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे, असा दावा केला होता. याची दखल घेत न्यायालयाने निवडणुक आयोगाला चौकशी करून या प्रकरणी निर्णय घ्यावा असे निर्देष देत याचिका पूर्णपीठाकडे वर्ग केली होती.

Gram Panchayat Election : ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा! तुमच्या जिल्ह्यात काय परिस्थिती?

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2026 | शनिवार

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Embed widget