एक्स्प्लोर

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर यांचं जातप्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला हायकोर्टाकडून स्थगिती

सोलापूरचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. जातपडताळणी समितीकडून शिवाचार्य यांचं जातप्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे. तसंच पुढील सुनावणी 8 एप्रिलला होणार असून सर्व प्रतिवाद्यांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

मुंबई : सोलापूरमधील भाजप खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांना गुरुवारी (12 मार्च) मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. जातपडताळणी समितीकडून शिवाचार्य यांचं जातप्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला न्यायमूर्ती के. के. तातेड आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठानं स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 एप्रिलपर्यंत तहकूब करत सर्व प्रतिवाद्यांना उत्तर दाखल करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. जात पडताळणी समितीकडे आपले म्हणणे मांडण्याची पुरेशी संधीच मिळाली नसल्याचे डॉ. शिवाचार्य यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. तक्रारदाराने हायकोर्टात आपली बाजू मांडताना कोर्टाला सांगितलं की, 15 दिवसांचा अवधी देण्यात येऊनही पुरावे सादर न करता डॉ. शिवाचार्य यांनी वेळोवेळी विविध कारणे सांगून वेळ मागून घेतला. अद्यापही त्यांनी पुरावे सादर केलेले नाहीत. इतकंच काय तर आधी आपलं जातप्रमाणपत्र कोर्टात जमा आहे, असा दावा त्यांनी केला होता आणि काही दिवसांनी तो केरळमध्ये प्रवासादरम्यान हरवल्याची माहिती दिली. त्यामुळे बचावाची पूर्ण संधी असूनही त्यांनी केवळ वेळकाढूपणा केला. तर शिवाचार्य यांच्याकडे साल 1982 मधील जातीच्या दाखल्याची केवळ झेरॉक्स प्रत असून त्याची मूळप्रत अद्याप त्यांनी सादर केलेली नाही. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांनी पूर्ण तपासाअंती हा जातीचा दाखला बोगस असल्याचा अहवाल सादर केला आहे, अशी माहिती सरकारी वकिलांनी हायकोर्टात दिली. लोकसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धींचा पराभव करुन भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी तथा नूरदय्यास्वामी या हिरेमठ विजयी झाले आहेत. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू लिंगायत असा उल्लेख असून त्यांनी बेडा जंगम जातीचा बनावट दाखला तयार केला आहे, असा आरोप करत अपक्ष उमेदवार आणि माजी महापौर प्रमोद गायकवाड यांनी सोलापूर जिल्हा जात पडताळणी समितीकडे तक्रार केली आहे. जात पडाळणी समितीने डॉ. शिवाचार्य यांनी जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी दक्षता समिती नियुक्त केली. त्यानंतर या समितीने  कागदपत्रांची माहिती घेत डॉ. शिवाचार्य यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्याचं ठरवत हे जात प्रमाणपत्र रद्द केले. तसेच तहसीलदारांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या निर्णयाविरोधात डॉ. शिवाचार्य यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. Jay Siddheshwar Maharaj | खासदार जयसिद्धेश्वर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे सोलापूर न्यायालयाचे आदेश
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News : साधुग्रामच्या जागेवर चक्क रेस्टॉरंट, बॅक्वेंट हॉलची उभारणी? तपोवनातील 220 कोटी रुपयांचे टेंडर वादाच्या भोवऱ्यात, पर्यावणप्रेमी संतप्त
नाशिकमधील साधुग्रामच्या जागेवर चक्क रेस्टॉरंट, बॅक्वेंट हॉलची उभारणी? तपोवनातील 220 कोटी रुपयांचे टेंडर वादाच्या भोवऱ्यात, पर्यावणप्रेमी संतप्त
Jaykumar Gore: कोण तिजोरी, तर कोणी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे म्हणतंय, पण बँकच आमच्याकडे आहे; मंत्री जयकुमार गोरेंनी मित्र पक्षालाच डिवचलं
कोण तिजोरी, तर कोणी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे म्हणतंय, पण बँकच आमच्याकडे आहे; जयकुमार गोरेंची करमाळ्यात तुफान फटकेबाजी
Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Maharashtra Live blog: तुमच्याकडे तिजोरीची चावी असेल पण अख्खी बँक आमची आहे; जयकुमार गोरेंचा अजितदादांच्या राष्ट्रवादीला टोला
Maharashtra LIVE: तुमच्याकडे तिजोरीची चावी असेल पण अख्खी बँक आमची आहे; जयकुमार गोरेंचा अजितदादांच्या राष्ट्रवादीला टोला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

chunkey Pandey Majha Katta : तिच्या वडिलांचा विरोध होता, चंकी पांडेंची लव्ह स्टोरी ऐका
Nitin-Kanchan Gadkari Majha Maha Katta : राजकारण कशाशी खातात मला माहित नव्हतं, कांचन गडकरी म्हणाले
Nitin Gadkari Majha Maha Katta : राजकारण वाईटाकडे का जातंय? नितिन गडकरींनी माध्यमांचं काम सांगितलं
Nitin-kanchan Gadkari Majha Maha Katta:मुलाने नितीन गडकरींचे पाय बांधले,कांचनाताईंनी सांगितला किस्सा
Mahayuti Politics : महायुतीचा सस्पेन्स, शिंदेंचा डिफेन्स! रविंद्र चव्हाणांच्या विधानाचं गूढ वाढलं! Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik News : साधुग्रामच्या जागेवर चक्क रेस्टॉरंट, बॅक्वेंट हॉलची उभारणी? तपोवनातील 220 कोटी रुपयांचे टेंडर वादाच्या भोवऱ्यात, पर्यावणप्रेमी संतप्त
नाशिकमधील साधुग्रामच्या जागेवर चक्क रेस्टॉरंट, बॅक्वेंट हॉलची उभारणी? तपोवनातील 220 कोटी रुपयांचे टेंडर वादाच्या भोवऱ्यात, पर्यावणप्रेमी संतप्त
Jaykumar Gore: कोण तिजोरी, तर कोणी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे म्हणतंय, पण बँकच आमच्याकडे आहे; मंत्री जयकुमार गोरेंनी मित्र पक्षालाच डिवचलं
कोण तिजोरी, तर कोणी तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहे म्हणतंय, पण बँकच आमच्याकडे आहे; जयकुमार गोरेंची करमाळ्यात तुफान फटकेबाजी
Nitin Gadkari: 'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
'मी आयुष्यात कधीच कॅलक्युलेशन केलं नाही, आनंदी राहायचं असेल, तर...' नितीन गडकरींनी सपत्नीक दिला सुखी आयुष्याचा कानमंत्र
Maharashtra Live blog: तुमच्याकडे तिजोरीची चावी असेल पण अख्खी बँक आमची आहे; जयकुमार गोरेंचा अजितदादांच्या राष्ट्रवादीला टोला
Maharashtra LIVE: तुमच्याकडे तिजोरीची चावी असेल पण अख्खी बँक आमची आहे; जयकुमार गोरेंचा अजितदादांच्या राष्ट्रवादीला टोला
Donald Trump : पुढच्या वर्षी G-20 परिषदेत दक्षिण आफ्रिकेला नो एंट्री, त्यांना मिळणार सर्व अनुदान थांबवणार, डोनाल्ड ट्रम्प संतापले
डोनाल्ड ट्रम्प यांचा दक्षिण आफ्रिकेला धक्का, पुढील वर्षी G-20 चं निमंत्रण नसणार, अनुदान थांबवणार
Girish Mahajan on Tapovan Trees: आम्ही प्रत्येक पावसाळ्यात अनेक झाडं लावतो, तपोवनची जागा शेकडो वर्षांपासून साधुग्रामसाठी आरक्षित: गिरीश महाजन
साधुग्रामसाठी तपोवनातील फक्त रोपटी तोडणार, दुसरीकडे नवी झाडं लावायला 15 हजार खड्डे खणतोय: गिरीश महाजन
Gaja Marne: कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
कुख्यात गुंड गजा मारणेला विशेष मोक्का न्यायालयाकडून जामीन मंजूर; जेलमधून सुटताच थेट पुणे पोलिस आयुक्तालयात
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
आता घरबसल्या क्षणात आधार मोबाईल नंबर बदला! कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नाही; अशी आहेस स्टेप बाय स्टेप प्रोसेस
Embed widget