एक्स्प्लोर
हार्दिक पटेल आणि उद्धव ठाकरेंची संयुक्त पत्रकार परिषद
मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचा सामना करण्यासाठी शिवसेनेला, गुजरातच्या पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलची साथ मिळण्याची शक्यता आहे.
पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी हार्दिक पटेलनं मोदी सरकारविरोधात मोठं आंदोलन छेडलं होतं. त्यामुळं आता बीएमसीच्या निवडणुकीतही हार्दिक सेनेच्या सोबत येण्याची शक्यता आहे.
हार्दिक काल रात्री साडेदहाच्या सुमारास मुंबईत दाखलही झाला. त्यानंतर आज तो दुपारी बाराच्या सुमारास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता उद्धव ठाकरे आणि हार्दिक पटेलची संयुक्त पत्रकार परिषद होईल.
महाराष्ट्रात सध्या महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांची धामधूम आहे. त्यातही मुंबई महापालिका निवडणूक शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते आहे. त्यामुळे शिवेसेना हार्दिक पटेलला भाजपविरोधात प्रचारासाठी मैदानात उतरवणार का, असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
कोण आहे हार्दिक पटेल?
हार्दिक पटेलने गुजरातमध्ये पटेल समाजाच्या आरक्षणासाठी मोठं आंदोलन उभं केलं होतं. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर हार्दिक पटेल प्रसिद्धीस आला होता.
हार्दिक पटेलने जाहीर सभांमधून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यामुळे या सर्व गोष्टींचा शिवसेना प्रचारासाठी वापर करु शकते का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement