एक्स्प्लोर

कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन

गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या कष्टकरी जनसंघाच्यावतीने ट्रान्सपोर्ट कमिशनर यांच्या कार्यालयात धडकी दिली.

मुंबई : राजधानी मुंबईत मराठीसाठी शिवसेना आणि मनसे कायमच आग्रही असते, शिवसेनेत फूट पडल्यानंतरही दोन्ही शिवसेनेची मराठीसाठी तीच भूमिका पाहायला मिळते. त्यातच, मराठी लिहिता वाचता येत नसेल त्या रिक्षा टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याचा मोठा निर्णय राज्याचे परिवहन मंत्री तथा शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. विशेष म्हणजे, येत्या 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या दिवसापासून ही कारवाई केली जाणार आहे, असे आदेश देखील परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap sarnaik) यांनी दिले आहेत. मात्र, निर्णयाला रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटना आणि संयुक्त कृती समिती अध्यक्ष शशांक राव यांनी तीव्र विरोध केला असून आता अॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna sadavarte) हेही मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे. 

गुणरत्न सदावर्ते यांनी आपल्या कष्टकरी जनसंघाच्यावतीने ट्रान्सपोर्ट कमिशनर यांच्या कार्यालयात धडकी दिली. तसेच, प्रताप सरनाईक यांच्या निर्णयाला विरोध करत संबंधित अधिकाऱ्यांस निवेदनही दिले. महाराष्ट्र तसेच देशभरात 1 मे हा दिवस “कामगार दिन” म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांवर कोणत्याही प्रकारचा मानसिक, सामाजिक किंवा प्रशासकीय त्रास होणार नाही याची खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अशा दिवशी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणारी कोणतीही बेकायदेशीर, संविधानविरोधी किंवा कायद्याविरोधी विधाने व कृती करणे ही गंभीर बाब आहे, असे म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी आज ट्रान्सपोर्ट आयुक्तांना रॅपिडो आणि रिक्षाचालकांच्यावतीने निवेदन दिले. 

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षाचालकांना केलेल्या मराठी सक्तीचा विविध कामगार संघटनांनी स्पष्ट विरोध दर्शविला असून, भाषेच्या नावाखाली कोणत्याही नागरिकास किंवा कामगारास त्रास दिला जाणार नाही ही मूलभूत अपेक्षा व्यक्त केली आहे. भाषा हा संवादाचा विषय असून, ती दडपशाहीचे साधन बनविणे हे संविधानाच्या तत्त्वांना बाधक आहे, असे सदावर्ते यांनी म्हटलंय. ट्रान्सपोर्ट कमिशनर हे संबंधित क्षेत्रातील प्रमुख असल्याने, त्यांच्या अधिकारक्षेत्रातील सर्व यंत्रणांनी कोणत्याही चालकास बेकायदेशीर त्रास होणार नाही याची खात्री करणे ही त्यांची प्रशासकीय व कायदेशीर जबाबदारी आहे, असे म्हणत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाकडे रिक्षाचालकांनी मागण्या केल्या आहेत.

आंदोलकांच्या मागण्या काय?

भाषेची सक्ती करण्यासंदर्भात कोणतीही बेकायदेशीर कारवाई तात्काळ थांबविण्यात यावी.
चालकांच्या बॅज/लायसन्स संदर्भात due process शिवाय कोणतीही कारवाई होणार नाही याबाबत स्पष्ट आदेश जारी करावेत.
माध्यमांमध्ये पसरत असलेल्या भ्रामक व बेकायदेशीर विधानांबाबत प्रशासनाने आपली स्पष्ट भूमिका जाहीर करावी.
1 मे पासून कोणत्याही चालकावर अन्यायकारक किंवा बेकायदेशीर कारवाई होणार नाही याची खात्री द्यावी.

हेही वाचा

बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण

About the author अजय माने

अजय माने
Read More

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
कोल्हापुरात मिलिंद नार्वेकरांनी घेतली उदय सामंतांची भेट तर मुंबईत शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीसाठी, नेमकं कारण काय? 
BMC : वांद्र्यातील फुटबॉल मैदानाचे आरक्षण बदलण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध, नगरसेवकांनी घेतली आयुक्तांची भेट
वांद्र्यातील फुटबॉल मैदानाचे आरक्षण बदलण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध, नगरसेवकांनी घेतली आयुक्तांची भेट
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
मोठी बातमी! पशुधनाचा मृत्यू झाल्यास मिळणार आर्थिक मदत, काय आहेत निकष? कोणत्या जनावरांसाठी किती मदत?
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Deepfake Ban Rules : एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
एआय डीपफेकवर केंद्र सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आक्षेपार्ह फोटो-व्हिडीओ 3 तासांत हटवावे लागणार
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
टीम इंडियात धावाधाव सुरु! आता फिटनेस सिद्ध करण्यासाठी 10 मिनिटात किती किमी पळावं लागणार? 1200 मीटर किती मिनिटात पूर्ण करावी लागणार? हा सुद्धा नियम ठरला
Womens Asia Cup 2026 : आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
आशिया कपचं वेळापत्रक जाहीर, भारत पाकिस्तान 'या' दिवशी आमने सामने, दुबईत स्पर्धा रंगणार
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
Embed widget