एक्स्प्लोर

वर्षभरापासून मी तुमची वाट पाहतोय.. महाराष्ट्राच्या 'राज'चे आज दर्शन झालं : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली.वाढीव वीज बिल प्रश्नी शरद पवार आणि वेळ पडल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेईन : राज ठाकरे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली. वाढीव वीज बिलासंदर्भात सरकारने तातडीने निर्णय घेऊन जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी यावेळी केली. राजभवनात राज्यपालांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. या चर्चेवेळी काही किस्सेही घडल्याचे पाहायला मिळाले.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी : 1 साल से मै आपकी राह देख रहा हूँ.. महाराष्ट्र के राज के आज दर्शन हुए. त्यानंतर राज ठाकरेंनी पुष्पगुच्छ आणि निवेदन दिले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे : वाढीव विजबिलांमुळे लोकांचे हाल होत आहेत, ज्यांना 5 हजार बिलं यायची त्यांना 25 हजार बिलं येतायत. लॉकडाऊनमुळे नोकरी-धंदे बंद असल्यानं लोकांनी पैसै आणायचे कुठून. अनेक दिवसांपासून आम्ही संबंधीत विभागाची मंत्री, अधिकाऱ्यांशी बोललो, बैठका घेतल्या, आंदोलन केली पण तरी ही सरकारने कोणता ही निर्णय घेतला नाही. मला अशी माहिती मिळाली आहे की सरकारच्या बैठका होऊन सगळं ठरलं आहे. मात्र, शिवसेना-राष्ट्रवादीच्या श्रेयवादामुळे लोकांना दिलासा मिळत नाही. त्याचप्रमाणे हे खातं काँग्रेसकडे असल्यानं त्यामुळे तिन्ही पक्षांमधे समन्वय नाही आणि म्हणून लोकांना दिलाशाचा निर्णय होत नाही. त्यामुळे आपण राज्यपाल म्हणून दखल घेत योग्य ती कारवाई केली तर बरं होईल.

वाढीव वीज बिलाबाबत राज्यपालांना निवेदन; शरद पवार, मुख्यमंत्र्यांचीही भेट घेईन : राज ठाकरे

राज्यपाल : या सरकारमधे शरद पवारांचं ऐकलं जातं त्यामुळे आपणही शरद पवारांशी एकदा बोला. मी सरकारला पत्र पाठवीन पण त्यावर सरकार काही करणार का? याबद्दल मला शंका आहे, म्हणून आपण शरद पवारांशी बोललात तर हा प्रश्न सुटू शकतो. पण तरीही मी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलीन आणि जे काही करता येईल ते निश्चित करेन.

राज ठाकरे : मी पवारांशी निश्चित बोलेन. मात्र, आपण राज्याचे प्रमुख म्हणून जनतेच्या हिताचं पाऊल उचालाल अशी अपेक्षा आहे.

मनसे सरचिटणीस बाळा नांदगावकर : नितिन राऊत म्हणतात जर केंद्रानं 10 हजार कोटी दिले तर लोकांना आम्ही दिलासा देऊ शकू.

राज्यपाल : जेव्हा या कंपनीज उभ्या राहतात तेव्हा पायाभूत सुविधांसाठी केंद्र सरकार मदत करतेच.

राज ठाकरे : दूधदरवाढीचा विषय शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. त्यांनाही दिलासा मिळाला पाहिजे.

राज्यपाल : मी शेतकऱ्यांच्या हितासाठी योग्य ते पाऊल उचलेन.

या चर्चेत राज्यपाल यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थिती केले.

जाता जाता.. राज्यपाल : राज आपकी हिंदी इतनी अच्छी कैसी है! राज ठाकरे : मै हिंदी पिक्चर बहुत देखता हूँ इसिलिये मे!

Raj Thackeray |वाढीव वीजबिलांबाबत राज्यपालांशी चर्चा, वेळ पडल्यास मुख्यमंत्र्यांना भेटेन : राज ठाकरे

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget