एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई विमानतळावर 29 लाखांची सोन्याची बिस्किटं जप्त, एक अटकेत
मुंबई : मुंबई विमानतळावर कस्टमच्या कारवाईत 29 लाखांची सोन्याची बिस्किटं जप्त करण्यात आली आहेत. रियाधहून आलेल्या विमानातून सोन्याची बिस्किटं आणल्याप्रकरणी मोहम्मद अल्ताफ मोईदिन या भारतीय नागरिकाला अटक करण्यात आली आहे.
सौदी अरेबियातील रियाधहून आलेलं जेट एअरवेजचं विमान मुंबई विमानतळावर उतरलं. मुंबईमार्गे हे विमान मंगळुरुला जाणार होतं. त्यापूर्वी कस्टमच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत मोहम्मदकडे 1160 ग्रॅम वजनाची दहा सोन्याची बिस्किटं जप्त करण्यात आली.
दहा सोन्याच्या बिस्किटांची किंमत 29 लाख 68 हजार 585 रुपये असल्याची माहिती आहे. चार सोन्याची बिस्किटं एलईडी इमर्जन्सी लाईटमध्ये भरुन आणली होती, तर उर्वरित सोन्याच्या बिस्किटांवर काळी पट्टी चिकटवण्यात आली होती. मोहम्मदला मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement