एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई विमानतळावर कोट्यवधींचं सोनं जप्त
मुंबई : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागानं धडक कारवाई करत कोट्यवधी रुपयांचं सोनं आणि नव्या नोटांची रोकड जप्त केली आहे. 7 किलो 378 ग्रॅम सोनं, सुमारे दोन कोटी रुपयांचे दागिने आणि 2 हजारच्या नोटांची साडेसात लाखांची रोकड एवढा ऐवज कस्टमच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागला आहे.
मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका बॅगेत हा सारा ऐवज भरण्यात आला होता. पण कस्टम विभागाच्या भीतीनं त्यानं बॅग सोडून दिली होती. जेट एअरवेजच्या प्रवाशानं बॅगेची डिलीवरी घेण्याची सुचना ऐकताच काऊंटरकडे धाव घेतली आणि कस्टमच्या अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतलं.
या प्रवाशाला अटक केल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. त्याला 9 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. दुसऱ्या एका कारवाईदरम्यान मुंबई विमानतळावर 5 कोटींच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement