एक्स्प्लोर
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र
अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक निकष मराठी भाषा पुर्ण करते. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही हे प्रकरण केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे प्रलंबित आहे, असे ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
![मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र Give Marathi as the language of the elite Cm Uddhav Thackeray write letter to PM Modi मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पंतप्रधानांना पत्र](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/04/25231857/Narendra-Modi-Uddhav-Thackeray.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: लक्ष घालून तातडीने आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावे, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारकडे 16 नोव्हेंबर 2013 रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक निकष मराठी भाषा पुर्ण करते. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही हे प्रकरण केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे प्रलंबित आहे, असे ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे. संबंधित विभागाने सदर प्रकरण साहित्य अकादमीच्या भाषा समितीकडे विचारार्थ असल्याचे कळविले आहे. बराच कालावधीपासून हे प्रकरण प्रलंबित असल्याने पंतप्रधानांनी स्वत: लक्ष घालून मराठीला तातडीने अभिजात भाषेचा दर्जा द्यावा, असे ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा - मराठीसाठी मनसे पुन्हा आक्रमक, अभिजात भाषेच्या दर्जासाठी मोदींना पाठवली 10 हजार पोस्टकार्ड
राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी देखील लोकसभेत मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा प्रश्न उपस्थित केला होता. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित असून त्याकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती त्यांनी सरकारला केली होती.
अभिजात भाषेच्या दर्जासाठी नरेंद्र मोदींना 10 हजार पोस्टकार्ड
तमिळसह संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम, ओडिआ या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, मग मराठीला का नाही? असा सवाल करत आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला होता या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना 10 हजार पोस्टकार्ड पाठवली होती. मराठीने अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासंदर्भातील सर्व निकष पूर्ण करुन आता साडेचार वर्ष उलटली आहेत. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या भाषा तज्ज्ञांनी एकमताने मराठीच्या बाजूने शिफारस केलेली असतानाही केंद्र सरकार ही घोषणा करायला टाळाटाळ करत असल्याचा आरोप मनसेने केला होता.
मराठीला अभिजात दर्जा देण्यासंदर्भात राज्य सरकारकडून केंद्रात पाठपुरावा करु, असं आश्वासन सरकारकडून वारंवार दिलं गेलं आहे. या आधीही काही खासदारांनी हा मुद्दा मागच्या टर्ममधे उपस्थित केला होता. त्यामुळे आता पुन्हा एकजुटीने याबाबत काही आवाज उठवला जाणार का? हे देखील पाहणे महत्त्वाचे असेल.
हेही वाचा- मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, खासदार सुनील तटकरेंची संसदेत मागणी
राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करावी, अशी मागणी मराठी साहित्यिकांनी केली होती. साहित्यिकांच्या वतीने संभाव्य कायद्याचं प्रारुप तयार करुन ते राज्य सरकारला सादर करण्यात आलं आहे. 15 ऑगस्टनंतर सरकारने वटहुकूम काढून मराठी सक्तीची करावी, अशी मागणी मराठी साहित्यिकांनी केली होती. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख तसेच मराठीच्या भल्यासाठी व्यासपीठाचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक मराठी भाषेविषयी सरकारचा लक्ष वेधण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केलं होतं.
हेही वाचा - राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करा, मराठी साहित्यिकांची मागणी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
राजकारण
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)