एक्स्प्लोर
Advertisement
प्रियकराला दहशतवादी ठरवण्यासाठी तरुणीचं छोटा शकीलच्या नावाने पत्र
मुंबई : मुंबईतल्या शिवानी भिंगार्डे नावाच्या तरूणीने आपल्या प्रियकरावर सूड उगवण्यासाठी एक कट रचला. पूर्व प्रियकराला छोटा शकीलचा माणूस असल्याचं भासवण्यासाठी तिन रेल्वे पोलिसांना एक पत्र सोपवलं. ज्यात छोटा शकीलचा माणूस बॉम्बस्फोटासाठी मुंबईला येणार असल्याचा उल्लेख होता.
शुक्रवारी सकाळी अत्यंत गर्दीच्या वेळी शिवानी भिंगार्डे (२४) हिने दादर रेल्वे स्थानकावर गस्तीवर असणाऱ्या रेल्वे सुरक्षा बलाच्या दोन कॉन्स्टेबल्सना एक निळ्या रंगाचं पाकिट दिलं. तिला ते ब्रिजवर सापडल्याचं तिनं सांगितलं. पोलिसांनी तिला स्टेशन मास्तरकडे जायला सांगितलं. मात्र वेळ नसल्याचं सांगत पाकीट तिथंच बाकड्यावर ठेवून ही तरुणी निघून गेली.
कॉन्स्टेबल्सनी ते पाकिट उघडून पाहिलं तर आत एक 100 रुपयांची नोट आणि एक चिट्ठी होती. छोटा शकीलने भारतात बॉम्बस्फोट करण्यासाठी माणून पाठवला आहे. पुढील सर्व प्लॅन मुझफ्फरला माहित आहे, असं लिहिलेल्या पत्रात तीन मोबाईल क्रमांकही लिहिलेले होते.
चिठ्ठी वाचताच पोलिसांची दाणादाण उडाली. रेल्वे पोलीस, GRP आणि दहशतवाद विरोधी पथक तातडीने कामाला लागले. चिठ्ठीत लिहिलेला 'अतिरेक्यांचा म्होरक्या' मुझफ्फर आणि ती पाकीट देणारी मुलगी या दोघांचा पोलीस शोध घेऊ लागले. दादर स्थानकावरचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांनी शिवानी आणि त्या RPSF कॉन्स्टेबल्समधील 20 सेकंदाचं संभाषण झालेलं पाहिलं, त्यानंतर ती दादरच्या पश्चिम दिशेने बाहेर पडली.
चिठ्ठीत असलेल्या मोबाईल क्रमांकावरुन पोलिसांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेतला. ही व्यक्ती दररोज मुंबई ते पुणे प्रवास करते, असं समजलं. मुझफ्फर पुण्यात असल्याचं समजल्यानंतर पोलिसांनी त्याला पुण्यातून ताब्यात घेतलं. मात्र गोंधळलेल्या मुझफ्फरला हा सर्व प्रकार लक्षात आला नाही. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज दाखवल्यानंतर त्या तरुणीशी आपले प्रेमसंबंध होते, असं मुझफ्फरने कबुल केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
मुंबई
राजकारण
बॉलीवूड
Advertisement