एक्स्प्लोर
दिलगिरी हा गुळगुळीत राजकीय शब्द वाटेल म्हणून माफी मागतो : महाजन
नंदुरबारमध्ये सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमावेळी बोलताना, साखर कारखान्याने निर्मित केलेल्या दारुच्या ब्रॅण्डला महिलेचं नाव दिल्यास अधिक खप होईल, असं वादग्रस्त विधान गिरीश महाजन यांनी केलं होतं.
मुंबई : "दारुचे 65 ब्रॅण्ड आहेत, ज्यांना डिमांड नाही. म्हणून मी गमतीत म्हटलं महिलांचं नाव देऊन बघा. विनोदाचा भाग म्हणून बोललो. कुठल्याही महिलेचा अपमान करण्याचा माझा उद्देश नव्हता. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो," अशा शब्दात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन वादग्रस्त विधानाबाबत माफी मागितली आहे.
नंदुरबारमध्ये सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या कार्यक्रमावेळी बोलताना, साखर कारखान्याने निर्मित केलेल्या दारुच्या ब्रॅण्डला महिलेचं नाव दिल्यास अधिक खप होईल, असं वादग्रस्त विधान गिरीश महाजन यांनी केलं होतं.
महाजनांविरोधात महिला आक्रमक
महाजन यांच्या विधानावर जोरदार टीका होऊ लागली. दारुबंदी आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी गिरीश महाजनांविरोधात चंद्रपुरातील मूल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तर नाशिक आणि सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन केलं.
दारुच्या ब्रँडला महिलांचं नाव, गिरीश महाजनांविरोधात तक्रार
यासंदर्भात गिरीश महाजन यांनी आज स्पष्टीकरण देत माफी मागितली. "विनोदाचा भाग म्हणून मी बोललो. कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो. दिलगिरी हा गुळगुळीत राजकीय शब्द वाटेल म्हणून मी माफी मागतो," असं ते म्हणाले.
मी स्पोर्ट्समन; कधीही दारु, बिडीला हात लावला नाही.
गिरीश महाजन म्हणाले की, "मी दारु पिऊन बोललो, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली. मात्र माझ्या 25 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत कधीही दारु, पान, बिडी, तंबाखूला हात लावलेला नाही. मी स्पोर्ट्समन आहे. मी नेहमीच दारुमुक्ती, नशामुक्ती मोहिमेला पाठिंबा दिला आहे. मात्र दारुच्य ब्रॅण्डबाबतचं वक्तव्य चुकून झालं. मी चुकल्याची जाणीव झाली. मी जे बोललो त्याबद्दल मला खंत आहे."
गिरीश महाजनांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
जे विरोध करत आहेत, त्यांच्या ब्रॅण्डनाच महिलांची नावं
"दुर्दैवाने मला आज जे विरोध करत आहेत, त्यांचे कारखाने आहेत आणि त्यांच्या दारुच्या ब्रॅण्डला महिलांची नावं आहेत. याबाबाबतच मी कुतूहलाने बोललो. मात्र ती माझी चूक आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. मला आता त्या विषयात जायचं नाही. पण ज्यांनी महिलांची नावं दिली आहेत, त्यांचीही चौकशी व्हायला हरकत नाही. याबाबाबत कोणी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली तर नक्की याबाबत विचार करु," असं महाजन म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
बीड
Advertisement