Ganpati Visarjan 2025 LIVE: पुढच्या वर्षी लवकर या! तब्बल 33 तासांनंतर लालबागच्या राजाचे विसर्जन
Ganpati visarjan 2025: मुंबईतील अनेक मानाच्या गणपतींचे विसर्जन काल पार पडले. आता 33 तासांनंतर लालबागच्या राजाचंही विसर्जन पार पडलं.
LIVE

Background
Ganpati visarjan 2025: अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाचे काल अनंत चतुदर्शीला मुंबईतील गिरगाव चौपाटी आणि अन्य परिसरात विसर्जन (Ganesh immersion 2025) पार पडले. लालबागचा राजाचे थोड्याचवेळात गिरगाव चौपाटीवर आगमन होईल. यानंतर लालबागचा राजाला विशेष तराफ्यावर बसवून खोल समुद्रात नेले जाईल आणि त्याचे विसर्जन होईल. मुंबईतील अनेक ठिकाणी अद्याप सार्वजनिक गणेश मंडळांच्या मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन बाकी आहे. मुंबईतील पवई तलावाच्या परिसरात मोठ्या गणपतींची रिघ लागली आहे.
Lalbaugcha Raja Visarjan 2025: पुढच्या वर्षी लवकर या! तब्बल 33 तासांनंतर लालबागच्या राजाचे विसर्जन
Lalbaugcha Raja Visarjan 2025: तब्बल 33 तासानंतर अखेर लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडलं. यंदा वेळेचं नियोजन चुकल्यानं खोळंबा झाल्याचं दिसून आलं. या विसर्जनावेळी गिरगाव चौपाटीवर गणेशभक्तांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत भक्तांनी लालबागच्या राजाला प्रणाम केला.
























