एक्स्प्लोर

Ganeshotsav 2023: यंदा गणेशोत्सवाच्या नियमांत शिथिलता? नेमक्या कोणत्या मागण्यांबाबत शिफारसी?

Ganeshotsav 2023: बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची नुकतीच एक बैठक पार पडली आहे, या बैठकीत विविध गाईडलाईन्सवर चर्चा झाली.

Ganeshotsav 2023: गणेशोत्सव (Ganesh Chaturthi) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बाप्पांच्या आगमनाची सर्वच जण आतुरतेने वाट पाहत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीत गणेशोत्सव मंडळांशी चर्चा करण्यात आली आणि विविध मागण्यांबाबत विचारणा करण्यात येऊन प्रस्ताव ठेवण्यात आला. या संदर्भात बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती प्रशासनासोबत चर्चा करणार आहे.

काय आहेत गणेशोत्सव मंडळांच्या मागण्या?

1) गणपती मूर्तीच्या उंचीचा नियम शिथिल करावा.

2) ध्वनी प्रदुषणाबाबत जे खटले भरवण्यात आले आहेत ते मागे घ्यावेत.

3) तीन दिवसांऐवजी चार दिवस रात्री बारापर्यंत स्पीकरसाठी परवानगी द्यावी आणि रात्री बारा वाजल्यानंतर पारंपारिक वाद्य वाजवण्यासाठी परवानगी द्यावी.

4) बाप्पाच्या आगमनापूर्वी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यात यावे.

5) गणेशोत्सव काळात वस्तूंचे भाव नियंत्रणात ठेवावे.

6) गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या ऑनलाईन मिळाव्या.

या सर्व मागण्यांसंदर्भात बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने महापालिका प्रशासन आणि इतर प्रशासनाबरोबर 26 जुलै रोजी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत मुंबई पालिका प्रशासनासमोर या मागण्या ठेवण्यात येणार आहेत.

पीओपीच्या नियमांबाबत मोठा दिलासा

गणेशमंडळांना पीओपीच्या नियमांबाबत मोठा दिलासा मिळाला आहे. पीओपीला पर्याय सुचवण्याबाबतची मार्गदर्शक तत्व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाहीत, त्यामुळे 4 फुटांवरील मूर्तींसाठी पीओपीचा वापर करता येणार आहे. मात्र चार फुटांपेक्षा कमी उंच मुर्तींसाठी शाडूची माती बंधनकारक असणार आहे. दरम्यान, मूर्तीकार आणि मूर्ती विक्रेते-साठवणूकदारांना 'एक खिडकी' पद्धतीनं ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

बाप्पाच्या मूर्तींची 'एक खिडकी' पद्धतीनं ऑनलाईन नोंदणी

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आता मुंबई महानगरपालिकेकडून मूर्तीकार आणि मूर्ती विक्रेत्यांसाठी 'एक खिडकी' पद्धतीनं ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 

पोओपीच्या मूर्तींमुळे मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाची हानी होते आणि त्यामुळेच गेल्या अनेक वर्षांपासून पीओपीच्या गणेश मूर्तींवर बंदी घालण्याची मागणी सर्वच स्तरांतून होत आहे. त्यामुळे उंच गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना करणाऱ्या मंडळांसमोर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून मंडळांकडून सरकारकडे 'पीओपी'ला पर्याय देण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच, जरी मार्गदर्शक सूचना जारी केल्या, तरी या निर्णयाची अंमलबजावणी तातडीनं आणि सरसकट करता येणार नसल्याचं मूर्तिकारांचं म्हणणं आहे.

हेही वाचा:

Ganeshotsav 2023 Special Train: गणेशोत्सव काळात कोकण रेल्वेच्या 52 विशेष रेल्वे फेऱ्या, विशेष रेल्वेगाड्यांची एकूण संख्या 208 वर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Salil Deshmukh Nagpur Katol : वडिलांवर हल्ला , मुलाचा फडणवीसांवर निशाणाTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :19 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRaj Thackeray vs Uddhav Thackeray : राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना ठरवलं गद्दारGautam Adani Special Report : यूपीए सरकारमध्ये अदानींची भरभराट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
सलमान खानला धमक्या देणाऱ्या गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईच्या मुसक्या आवळल्या; कॅलिफोर्नियामध्ये अटक, चौकशी सुरू
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Sharad Pawar: एज इज जस्ट अ नंबर! 69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
69 सभा, 3 प्रेस कॉन्फरन्स; म्हातारं पायाला भिंगरी लावून फिरलं, आता चांगभलं हुणार का?
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Embed widget