एक्स्प्लोर

Ganeshotsav 2021 : गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेची नियमावली जाहीर; घरगुती गणपती, सार्वजनिक मंडळांसाठी महत्त्वाच्या सूचना

Mumbai Ganeshotsav : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचं संकट घोंघावताना आता गणेशोत्सव साधेपणानं साजरा केला जाणार आहे. यासाठी मुंबई पालिकेनं नियमावली जारी केली आहे.

Mumbai Ganeshotsav : गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिकेकडून नियमावली जाहीर करण्यात आलीये. घरगुती गणेशमुर्तींचं आगमन आणि विसर्जन प्रसंगी 5 जणांना परवानगी असणार आहे. तर सार्वजनिक गणेशमुर्तींच्या आगमन विसर्जनावेळी 10 जणांना परवानगी असणार आहे. गणपती आगमन विसर्जनावेळी भाविकांनी लसीचे दोन डोस घेतलेले असावेत, असाही नियम करण्यात आला आहे. 

देशासह राज्यात तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत काही प्रमाणात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवावरही निर्बंध लादण्यात येणार आहेत. काल (मंगळवारी) मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक पार पडली. या बैठकीत भाविकांना प्रत्यक्षदर्शन आणि मुखदर्शन घेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. गणेशोत्सव मंडळांनी भाविकांसाठी ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबूक, समाज माध्यमांद्वारे दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन द्यावी, असं यावेळी सांगण्यात आलं आहे. 

काय आहेत नियम? 

1. घरगुती गणेशाची मूर्ती शाडूची किंवा पर्यावरणपूरक असल्यास त्याचं विसर्जन शक्यतो घरच्या घरी बादलीत किंवा ड्रममध्ये करावं. घरच्या घरी करणं शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचं विसर्जन करण्यात यावं. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी मूर्तीचं विसर्जन करण्यास प्राधान्य द्यावं.

2. घरगुती गणेशोत्सवासाठीची मूर्ती शक्यतो शाडूची असावी किंवा शक्य असल्यास यावर्षी पारंपारिक शाडूच्या गणेशमूर्तीऐवजी घरात असलेल्या धातू / संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. जेणेकरुन, आगमन / विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वतःचे / कुटुंबियांचे कोविड-19 साथरोगापासून रक्षण करणे शक्य होईल.

3. मुंबईच्‍या महापौर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली, गणेशोत्‍सव मंडळाचे प्रतिनिधी यांच्‍या उपस्थितीत दिनांक 2 सप्टेंबर 2021 रोजी ऑनलाईन झालेल्‍या बैठकीत मागील काही दिवसांतील कोविड-19 रुग्‍णांची वाढती संख्‍या तसेच या साथरोगाची तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका विचारात घेता भाविकांना प्रत्‍यक्षदर्शन / मुखदर्शन घेण्‍यास सक्‍त मनाई आहे. गणेशोत्‍सव मंडळांनी भाविकांसाठी ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट, फेसबूक, समाज माध्‍यमे इत्‍यादीद्वारे दर्शनाची सुविधा उपलब्‍ध करुन द्यावी असा निर्णय घेण्‍यात आला.

4. घरगुती गणेशोत्‍सवाच्‍या विसर्जनाच्या वेळी मिरवणुकीने जाऊ नये, विसर्जनासाठी जास्तीत-जास्त 5 व्‍यक्‍ती असाव्‍यात. शक्‍यतोवर या व्यक्तिंनी कोरोना लसीकरणाचे 2 डोस घेतलेले असावेत आणि दुसरा डोस घेऊन 15 दिवस झालेले असावेत.

5. सार्वजनिक गणेशमूर्तींच्‍या आगमनाच्‍यावेळी 10 पेक्षा अधिक लोक असणार नाहीत. जे उपस्थित असतील ते मुखपट्टी (मास्क) वापरतील आणि सामाजिक अंतर पाळतील. तसेच शक्‍यतो सदर 10 व्यक्तिंनी ‘कोविड-19’ या रोगाच्‍या लसीकरणाचे 2 डोस घेतलेले असावेत आणि दुसरा डोस घेवून 15 दिवस झालेले असावेत. श्री गणेशाची मूर्ती ही सार्वजनिक उत्‍सवासाठी 4 फूटापेक्षा जास्‍त उंचीची नसावी. आगमनासाठी कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक काढण्‍यात येवू नये.

6. सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांनी हार/फुलं इत्यादीचा कमीत-कमी वापर करुन कमीत-कमी निर्माल्य तयार होईल याची दक्षता घ्‍यावी.

7. घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन करताना, संपूर्ण चाळीतील / इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी एकत्रितरित्या नेवू नयेत.

8. विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत-कमी वेळ थांबावे. विसर्जन प्रसंगी मास्‍क/शिल्‍ड इत्यादी स्‍वसंरक्षणाची साधनं काटेकोररित्‍या वापरण्‍यात यावी.

9. शक्यतोवर लहान मुलं आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जावू नये.

10. सार्वजनिक गणेशमूर्तींच्‍या विसर्जनाच्‍यावेळी 10 पेक्षा अधिक लोक असणार नाहीत. जे उपस्थित असतील त्‍यांनी मुखपट्टी (मास्‍क) वापरावे आणि सामाजिक अंतर पाळावे. तसेच सदर 10 व्यक्तिंनी शक्‍यतो कोरोना या रोगाच्‍या लसीकरणाचे 2 डोस घेतलेले असावेत आणि दुसरा डोस घेवून 15 दिवस झालेले असावेत. तसेच, कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक काढण्‍यात येवू नये.

11. सार्वजनिक गणशोत्‍सव मंडळांनी मंडपापासून विसर्जन स्‍थळापर्यंत मूर्ती असलेले वाहन मिरवणुकीसारखे अत्‍यंत धीम्‍या गतीने नेवू नये, तर वाहनातील गणेशमूर्तीला इजा पोहोचणार नाही अशा सामान्‍य गतीने वाहन विसर्जन स्‍थळी घेवून जावे. विसर्जनादरम्‍यान वाहन थांबवून रस्‍त्‍यांवर भाविकांना गणेशमूर्तीचे दर्शन घेवू देण्‍यास/पूजा करुन देण्‍यास सक्‍त मनाई आहे.

12. सन – 2021 गणेशोत्‍सवादरम्‍यान कोणत्‍याही मिरवणुकीस परवानगी नाही, याची देखील भाविकांनी नोंद घ्‍यावी.

13. मुंबई शहरात एकूण 73 नैसर्गिक विसर्जन स्‍थळे आहेत. तेथे महापालिकेद्वारे अतिरिक्‍त मनुष्‍यबळ देवून मूर्ती संकलनाची शिस्‍तबद्ध व्‍यवस्‍था उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. त्‍यांजकडे गणेशमूर्ती देण्‍यात यावी. या नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर नागरिकांनी किंवा सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळांच्‍या कार्यकर्त्‍यांनी थेट पाण्‍यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्‍यास प्रतिबंध आहे.

14. नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवरील गर्दी कमी होण्‍यासाठी महानगरपालिकेच्‍या 24 विभागांमध्‍ये सुमारे 173 ठिकाणी कृत्रिम तलाव देखील निर्माण करण्‍यात आले आहेत. कृत्रिम तलावालगत राहणा-या भाविकांनी शक्‍यतोवर सदर कृत्रिम तलावाचा वापर करावा.

15. महापालिकेच्‍या काही विभागांतर्गत काही गणेशमूर्ती संकलन केंद्रे निर्माण करण्‍यात आली आहेत.

16. मूर्ती संकलन केंद्रावर, कृत्रिम तलावांवर किंवा नैसर्गिक विसर्जन स्‍थळांवर उपलब्‍ध महापालिकेच्‍या व्‍यवस्‍थापनाकडे मूर्ती सूपूर्द करण्‍यापूर्वी मूर्तीची यथासांग पूजा व आरती घरीच किंवा मंडळाच्‍या मंडपातच करुन घेणे बंधनकारक आहे.

17. विसर्जनादरम्‍यान सामाजिक दूरीकरण अंतर (social distancing), मुखपट्टी / मास्‍क, सॅनिटायझर वापरणे इत्‍यादी संबंधीत नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

18. प्रतिबंधित क्षेत्र (containment zone) मध्‍ये असणा-या सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळाच्‍या मूर्तीचे विसर्जन मंडपातच करावयाचे आहे किंवा विसर्जन पुढे ढकलावयाचे आहे. सील्‍ड इमारतींमधील (sealed building) गणेशमूर्तीच्‍या विसर्जनासाठी घरीच व्‍यवस्‍था करावयाची आहे, याची कृपया नोंद घ्‍यावी.

19. उत्सव प्रसंगी अशी कोणतीही कृती करु नये, जेणेकरुन कोरोना विषाणूचा फैलाव होईल. अन्यथा अशा व्यक्ती साथरोग कायदा 1897, राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा 2005 व भादवि 1860 कायद्यान्वये कारवाईस पात्र ठरेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ST Bus Karnataka: कर्नाटकात जाणारी 'लालपरी'ची चाकं थांबली, कोल्हापूर, सोलापूर, सांगलीसह सीमावर्ती भागातल्या नागरिकांची गैरसोय
कर्नाटकात जाणारी 'लालपरी'ची चाकं थांबली, कोल्हापूर, सोलापूर, सांगलीसह सीमावर्ती भागातल्या नागरिकांची गैरसोय
Bhiwandi : भावाचं अपहरण केलं, बहिणीला बोलावून दोन वेळा सामूहिक बलात्कार, भिवंडीत सहा नराधमांवर गुन्हा
भावाचं अपहरण केलं, बहिणीला बोलावून दोन वेळा सामूहिक बलात्कार, भिवंडीत सहा नराधमांवर गुन्हा
कोल्हापुरात अवतरला तब्बल 25 कोटींचा 'आमदार', जगातील सर्वात उंच आणि महागडा रेडा तुम्ही पाहिला का? 
कोल्हापुरात अवतरला तब्बल 25 कोटींचा 'आमदार', जगातील सर्वात उंच आणि महागडा रेडा तुम्ही पाहिला का? 
Navneet Rana : नवनीत राणा हाज़िर हो! ओवैसी बंधूंवरील 15 सेकंदाच्या वक्तव्यावर हैदराबाद न्यायालयाची नोटीस
नवनीत राणा हाज़िर हो! ओवैसी बंधूंवरील 15 सेकंदाच्या वक्तव्यावर हैदराबाद न्यायालयाची नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8 AM : 23 Feb 2025 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : ABP Majha : 23 Feb 2025Maitreya Dadashree : मैत्रय दादाश्रीजी यांच्या प्रवचनाची पर्वणी : 23 Feb 2024 : ABP MajhaTop 70 News  : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : 23 Feb 2025 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Bus Karnataka: कर्नाटकात जाणारी 'लालपरी'ची चाकं थांबली, कोल्हापूर, सोलापूर, सांगलीसह सीमावर्ती भागातल्या नागरिकांची गैरसोय
कर्नाटकात जाणारी 'लालपरी'ची चाकं थांबली, कोल्हापूर, सोलापूर, सांगलीसह सीमावर्ती भागातल्या नागरिकांची गैरसोय
Bhiwandi : भावाचं अपहरण केलं, बहिणीला बोलावून दोन वेळा सामूहिक बलात्कार, भिवंडीत सहा नराधमांवर गुन्हा
भावाचं अपहरण केलं, बहिणीला बोलावून दोन वेळा सामूहिक बलात्कार, भिवंडीत सहा नराधमांवर गुन्हा
कोल्हापुरात अवतरला तब्बल 25 कोटींचा 'आमदार', जगातील सर्वात उंच आणि महागडा रेडा तुम्ही पाहिला का? 
कोल्हापुरात अवतरला तब्बल 25 कोटींचा 'आमदार', जगातील सर्वात उंच आणि महागडा रेडा तुम्ही पाहिला का? 
Navneet Rana : नवनीत राणा हाज़िर हो! ओवैसी बंधूंवरील 15 सेकंदाच्या वक्तव्यावर हैदराबाद न्यायालयाची नोटीस
नवनीत राणा हाज़िर हो! ओवैसी बंधूंवरील 15 सेकंदाच्या वक्तव्यावर हैदराबाद न्यायालयाची नोटीस
Chandrapur Tiger : वाघांची शिकार करणारी बहेलिया टोळी विदर्भात सक्रिय, चार महिन्यात चीनमध्ये 15 वाघांची तस्करी
वाघांची शिकार करणारी बहेलिया टोळी विदर्भात सक्रिय, चार महिन्यात चीनमध्ये 15 वाघांची तस्करी
Video : चित्त्यापेक्षाच्या चपळाईने कांगारू हवेत झेपावला अन् कॅच पकडला; अ‍ॅलेक्स कॅरीनं घेतलेला कॅच 'इंग्रज' बघतच राहिले!
चित्त्यापेक्षाच्या चपळाईने कांगारू हवेत झेपावला अन् कॅच पकडला; अ‍ॅलेक्स कॅरीनं घेतलेला कॅच 'इंग्रज' बघतच राहिले!
उपायुक्तांच्या निवासस्थानातून रोकड आणि डायमंड चोरीला; तलावात युद्धपातळीवर शोधमोहीम, यंत्रणा लागली कामाला
उपायुक्तांच्या निवासस्थानातून रोकड आणि डायमंड चोरीला; तलावात युद्धपातळीवर शोधमोहीम, यंत्रणा लागली कामाला
अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'ची चर्चा, पण भाजपशासित 'या' राज्यात वनसंवर्धनाच्या पैशातून आयफोन, लॅपटॉप, फ्रीज खरेदीची लयलूट; कॅगचे ताशेरे
अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'ची चर्चा, पण भाजपशासित 'या' राज्यात वनसंवर्धनाच्या पैशातून आयफोन, लॅपटॉप, फ्रीज खरेदीची लयलूट; कॅगचे ताशेरे
Embed widget