एक्स्प्लोर
मनसेची साथ सोडणाऱ्या 6 नगरसेवकांचा दोन दिवसात फैसला?
परंतु गेल्या तीन महिन्यापासून हे प्रकरण प्रलंबित आहे. त्यावर आज किंवा उद्या कोकण आयुक्त बैठक बोलवून फैसला देण्याच्या तयारीत आहेत.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मुंबईतील सहा नगरसेवकांचा लवकच फैसला होण्याची शक्यता आहे. कोकण आयुक्त आज किंवा उद्या या संदर्भात निकाल देतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसेने या नगरसेवकांवर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर या सहा नगरसेवकांनी कोकण आयुक्तांकडे वेगळ्या गटांची मागणी केली आहे.
परंतु गेल्या तीन महिन्यापासून हे प्रकरण प्रलंबित आहे. त्यावर आज किंवा उद्या कोकण आयुक्त बैठक बोलवून फैसला देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे कोकण आयुक्त काय निर्णय देतात त्यावर पुढची गणितं अवलंबून असणार आहेत.
सहा नगरसेवकांच्या पक्षांतरावर मनसेनेही वेळोवेळी आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे पात्र झाल्यास हे नगरसेवक शिवसेनेसाठी काम करतील. पण जर अपात्र ठरले तर पुढे काय हा प्रश्न शिवसेनेपुढे उभा राहील.
मनसेतून शिवसेनेत आलेले नगरसेवक
अर्चना भालेराव – वॉर्ड 126
परमेश्वर कदम – वॉर्ड 133
अश्विनी मतेकर- वॉर्ड 156
दिलीप लांडे – वॉर्ड 163
हर्षल मोरे – वॉर्ड 189
दत्ताराम नरवणकर- वॉर्ड 197
मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल = 227
- शिवसेना अपक्षांसह - 84 + 4 अपक्ष = 88
- भाजप अभासे आणि एक अपक्षासह - 83+अपक्ष 2= 85
- कॉंग्रेस - 30
- राष्ट्रवादी कॉंग्रेस - 9
- मनसे - 7
- सपा - 6
- एमआयएम - 2
शिवसेनेत गेलेले 4 नगरसेवक पुन्हा मनसेत परतणार?
7 नगरसेवक, 13 आमदार ते मनसेकडे उरलेला एकटा नगरसेवक
पहिल्या मास्टरस्ट्रोकनंतर शिवसेनेची तात्काळ दुसरी खेळी!
शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, मनसेचे सहा नगरसेवक सेनेसोबत
मनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण?
मॉकड्रीलचं कारण देत मुंबई महापालिकेच सर्व दरवाजे बंद!
करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोपदगाफटका योग्य नाही, नगरसेवकांवर राज ठाकरे भडकले
‘लवकरच मुंबईत आमचा महापौर’, सोमय्यांचं शिवसेनेला आव्हानअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement