एक्स्प्लोर
पावसाचा कहर, बंद रिक्षावरुन अंत्ययात्रा काढण्याची वेळ
पावसामध्ये चक्क रिक्षावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. पावसाच्या कहराने मृत व्यक्तीला चार खांदेही देता आले नाही. या व्हिडीओने प्रशासनाच्या नियोजन आणि आपत्कालीन यंत्रणेचे धिंडवडे उडवले.
वसई : पालघर जिल्ह्यासह वसई-विरारमध्ये पावसाने इतका कहर माजवला, की अत्यावश्यक सेवाही पुरवणं कठीण झालं आहे. अशा पावसात रविवारी सोशल मीडियावर एक व्हिडीओ वायरल झाला. ज्याने सर्वांना आवक केलं.
पावसामध्ये चक्क रिक्षावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. पावसाच्या कहराने मृत व्यक्तीला चार खांदेही देता आले नाही.
या व्हिडीओने प्रशासनाच्या नियोजन आणि आपत्कालीन यंत्रणेचे धिंडवडे उडवले.
हा व्हिडीओ नालासोपारा पश्चिम येथील पांचाळ नगर विभागातील असल्याचं सांगितलं जात आहे. पाणी भरल्याने एका व्यक्तीचं पार्थिव घेऊन जाताना या व्हिडीओत दिसत आहे.
पाणी भरल्याने रिक्षा बंद पडली आहे आणि काही लोक तिला धक्का मारत पाण्यातून घेऊन जात आहेत. सध्या हा व्हिडीओ वायरल होत आहे. कुणीतरी आपल्या घरातील खिडकीतून हा व्हिडीओ काढला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओची एबीपी माझाने पडताळणी केली असता, तो नालासोपाऱ्यातील असल्याचं समोर आलं.
व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बॉलीवूड
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement