(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इंधन आणि गॅस दरवाढीचा खवय्यांना फटका, हॉटेल-रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थाच्या किंमती 30 टक्क्यांनी वाढणार
दैनंदिन खर्च भरुन काढण्यासाठी लवकरच हॉटेलातील खाद्यपदार्थाच्या किमती वाढवण्याशिवाय पर्याय नाही, असं हॉटेल चालकांच्या आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी स्पष्ट केलंय.
मुंबई : कुठल्याही गोष्टीचं सेलिब्रेशन करायचं असेल तर हक्काचं ठिकाण असतं ते म्हणजे हॉटेल आणि रेस्टॉरंट... पण आता हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये जाणंही खिशाला परवडणारं राहिलेलं नाही. कारण हॉटेल, रेस्टॉरंटमधील पदार्थांच्या किंमती 30 टक्क्यांनी महागणार आहेत. इंधन दरवाढीपाठोपाठ, व्यावसायिक सिलेंडर दरातील वाढीचा फटका आता खवय्यांनाही बसणार आहे. कारण, दैनंदिन खर्च भरुन काढण्यासाठी लवकरच हॉटेलातील खाद्यपदार्थाच्या किमती वाढवण्याशिवाय पर्याय नाही, असं हॉटेल चालकांच्या आहार संघटनेचे अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी स्पष्ट केलंय.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे काही काळ व्यवसाय बंद असल्यानं खर्चात वाढ आणि उत्पन्नात घट झाली. त्यावेळची नुकसान भरपाई काढताना आणि व्यवसायात तग धरुन ठेवण्यासाठी खाद्यपदार्थाच्या किमती वाढवण्याशिवाय पर्याय नाही, असं शेट्टींनी म्हटलंय. त्यामुळे आता तुमचं हॉटेलातील डाईन-इनही महागणार आहे.
Petrol, Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलचे ताजे दर जारी; एक लिटरसाठी किती पैसे मोजावे लागणार?
सरासरी बघता वेगवेगळ्या हॉटेल्सचे वेगवेगळे दर असतात. वेगवेगळ्या हॉटेल्सचा खर्च देखील वेगळा असतो. सोबतच हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील पैसे वाढवून द्यावे लागतात. 1 जानेवारीपर्यंत ही भाववाढ अपेक्षित आहे. सरासरी बघता 15-20 टक्के भाववाढ झाली तरच रेस्टॉरंट व्यवसायिकांना दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया आहार संघटनेकडून देण्यात आली आहे.
छोट्या हॉटेल्समध्ये दिवसाला दोन व्यावसायिक सिलेंडरचा वापर होतो. तर मोठ्या रेस्टॉरंटमध्ये सरासरी पाच सिलेंडर्स वापरली जातात. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये सरासरी व्यवसायिक सिलेंडरचा भाव हजार रुपयांच्या आसपास होता आता तो दोन हजार रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे. परिणामी, हॉटेल व्यावसायिकांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे आणि उत्पन्नात घट झाल्याचं चित्र आहे गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये सरासरी व्यवसायिक सिलेंडरचा भाव हजार रुपयांच्या आसपास होता आता तो दोन हजार रुपयांच्या जवळपास पोहोचला आहे. परिणामी, हॉटेल व्यावसायिकांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे आणि उत्पन्नात घट झाल्याचं चित्र आहे.