एक्स्प्लोर
चार-चार तरुणींशी लग्न, ठाण्यातून आरोपीला अटक
ठाणे: वेबसाईटच्या माध्यमातून तरुणींना लग्नाचं आश्वासन देऊन त्यांना लुटणाऱ्या एका तरुणाला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सध्या त्याची कसून चौकशी करत आहेत.
एका मॅट्रीमोनियल वेबसाइटवर एका तरुणीनं लग्नासाठी आपलं प्रोफाइल पोस्ट केलं होतं. त्याच वेबसाइटवर आरोपी संजय वर्मानं देखील आपलं प्रोफाइल पोस्ट केलं होतं. या वेबसाइटवरच त्यांची ओळख झाली. आपण एक मोठा बिझनेसमन असल्याचं संजयनं त्या तरुणीला सांगितलं. त्यानंतर हळूहळू आपल्या जाळ्यात ओढून संजयनं तरुणीशी लग्न केलं.
पण, त्यानंतर आणखी एका महिलेच्या तक्रारीनंतर संजयचा खरा चेहरा समोर आला. मिळालेल्या माहितीनुसार, संजय वर्मानं आपल्या पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेतला असून आतापर्यंत त्यानं चार महिलांशी लग्न केलं आहे. या चारही तरुणींना त्यानं अशाच पद्धतीनं फसवून लग्न केलं आहे. दरम्यान, पोलिसांनी संजय वर्माला अटक केली असून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement