एक्स्प्लोर

रुग्णाकडून 500 आणि 1000 च्या नोटा नाकारणाऱ्या 'फोर्टीज'ला नोटीस

कल्याण (ठाणे) : 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा नाकारुन रुग्णाची गैरसोय केल्याप्रकरणी कल्याण येथील फोर्टीज हॉस्पिटलला जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या निर्देशाप्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे. आरोग्य सेवा संचालनालय तसेच जिल्हा शल्य चिकित्सक यांनी 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा स्वीकारण्याबाबत जिल्ह्यातील सर्वच खाजगी रुग्णालयांना रुग्णांची गैरसोय होऊ नये, याबाबत सूचना दिल्या होत्या, तसेच आवाहनही केले होते. भिवंडीचे रतिलाल शहा या रुग्णाच्या 1 लाख 70 हजार 118 इतक्या रकमेच्या बिलासाठी नोटा स्वीकारण्यास या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी नकार दिल्याने, त्यांचा मुलगा मितेश शहा यांची मोठी अडचण झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात त्यांचाकडे तक्रार आल्यानंतर तातडीने उपविभागीय अधिकारी प्रसाद उकार्डे व इतर महसूल कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलला भेट देऊन रुग्णास मदत करण्याचा सुचना दिल्या. त्याप्रमाणे उकार्डे यांनी हॉस्पीटलचे संचालक कुलकर्णी यांची भेट घेऊन रुग्णांची गैरसोय होऊ नये, अशी समज दिली. यावेळी रुग्णालयातर्फे या रुग्णास त्रास होणार नाही, असे आश्वस्त करण्यात आले. पण रात्री उशिराने आणखीही काही रुग्णांनी हेल्प डेस्कवर तक्रार करून संबंधित रुग्णालय विशिष्ट चलनाचीच मागणी करीत असल्याच्या तक्रारी केल्या. याची दखल घेऊन कायदा व सुव्यवस्थेचा भंग निर्माण होण्यासारखी परिस्थिती उद्भवू शकते असे वाटून उपविभागीय अधिकारी कार्यालयाने या रुग्णालयास नोटीस दिली. भारतीय दंड विधान संहिता कलम 188 अन्वये तसेच बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन कायदा 1949 मधील तरतुदीनुसार सक्षम प्राधिकारी यांच्याकडे कारवाई का करण्यात येऊ नये असे या नोटिशीत म्हटले असून उद्या (12 नोव्हेंबर) पर्यंत रुग्णालयाचा खुलासा न आल्यास कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असेही यात म्हटले आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Pandharpur News: विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर; पुढील वर्षीच्या विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 26 डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी होणार सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर; पुढील वर्षीच्या विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 26 डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी होणार सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव जागावाटपाचा फॉर्म्युला, ठाकरे गट 140-150, मनसे 60-70, पण शरद पवार सोबत आल्यास गणित कसं बदलणार?
राज-उद्धव जागावाटपाचा फॉर्म्युला, ठाकरे गट 140-150, मनसे 60-70, पण शरद पवार सोबत आल्यास गणित कसं बदलणार?
Vijay Hazare Trophy Schedule : विजय हजारे ट्रॉफीचा रणसंग्राम आजपासून! पहिल्याच दिवशी 19 सामने, दिग्गजांच्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष, रोहित-विराटचा सामना किती वाजता?
विजय हजारे ट्रॉफीचा रणसंग्राम आजपासून! पहिल्याच दिवशी 19 सामने, दिग्गजांच्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष, रोहित-विराटचा सामना किती वाजता?

व्हिडीओ

Sudhir Mungantiwar : जादू झाली, नाराजी गेली; सुधीरभाऊंना पक्ष ताकद कशी देणार? Special Report
Lote Parshuram MIDC : इटलीचा कारखाना, कोकणात कारमाना; लक्ष्मी ऑरगॅनिक लि. कंपनी वादात Special Report
Thackeray Brother Alliance : ठाकरेंच्या युतीचा नारा, वेळ दुपारी बारा Special Report
Mumbai Air Pollution : प्रदूषणाचा विषय खोल, कोर्टाचे खडे बोल; हवा प्रदूषण कसं रोखणार? Special Report
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Election BJP: भाजपने वाल्याचा वाल्मिकी केलाच, ठाण्यातील तडीपार गुंड मयूर शिंदेचा पक्षप्रवेश संपन्न, 'या' प्रभागातून उमेदवारी मिळण्याची शक्यता
ठाण्यातील तडीपार गुंड अखेर पावन झालाच, मयूर शिंदेचा भाजपमध्ये प्रवेश, कोणत्या वॉर्डमधून उमेदवारी?
Pandharpur News: विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर; पुढील वर्षीच्या विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 26 डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी होणार सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर; पुढील वर्षीच्या विठ्ठल रुक्मिणीमातेच्या पूजेची 26 डिसेंबरपासून ऑनलाईन नोंदणी होणार सुरू, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Raj Thackeray and Uddhav Thackeray: राज-उद्धव जागावाटपाचा फॉर्म्युला, ठाकरे गट 140-150, मनसे 60-70, पण शरद पवार सोबत आल्यास गणित कसं बदलणार?
राज-उद्धव जागावाटपाचा फॉर्म्युला, ठाकरे गट 140-150, मनसे 60-70, पण शरद पवार सोबत आल्यास गणित कसं बदलणार?
Vijay Hazare Trophy Schedule : विजय हजारे ट्रॉफीचा रणसंग्राम आजपासून! पहिल्याच दिवशी 19 सामने, दिग्गजांच्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष, रोहित-विराटचा सामना किती वाजता?
विजय हजारे ट्रॉफीचा रणसंग्राम आजपासून! पहिल्याच दिवशी 19 सामने, दिग्गजांच्या खेळाकडे साऱ्यांचे लक्ष, रोहित-विराटचा सामना किती वाजता?
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
Embed widget