(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दादर, वसई रोड रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल दुरुस्तीसाठी आजपासून बंद
सीएसएमटी स्थानकाजवळील हिमालय पूल दुर्घटना झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने पुलाची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्यास जलद गतीने सुरुवात केली आहे
मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील दादर आणि वसई रोड स्थानकांतील पादचारी पूल आजपासून (14 मे) बंद करण्यात येणार आहेत. दादर स्थानकातील चर्चगेट दिशेकडील पादचारी पूल सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 ते 4 दरम्यान हा पूल येतो. त्यामुळे प्रवाशांनी उर्वरित 4 पादचारी पुलाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
Mumbai Railway Bridge | दादर, वसई रोड रेल्वे स्थानकावरील पादचारी पूल दुरुस्तीसाठी आजपासून बंद | ABP Majhaवसई रोड स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 आणि 7 वरील मध्यवर्ती पादचारी पुलाचा उत्तरेकडील जिना 14 मेपासून ते 29 मेपर्यंत बंद करण्यात येणार आहे. या कालावधीत जिन्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी या दरम्यान पर्यायी पुलाचा वापर करावा, असं आवाहन पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
सीएसएमटी स्थानकाजवळील हिमालय पूल दुर्घटना झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने पुलाची दुरुस्ती आणि पुनर्बांधणी करण्यास जलद गतीने सुरुवात केली आहे. यासाठी पश्चिम रेल्वे मार्गावरील एकूण 42 नवीन पादचारी पूल, पुलांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीसाठी 100 कोटी 87 लाखांची तरतूद करण्यात आली आहे.