एक्स्प्लोर
मुंबईतील आठवीतल्या पाच विद्यार्थिनी काल दुपारपासून बेपत्ता
मुली बेपत्ता झाल्याचं समोर आल्यानंतर कुलाबा पोलीस ठाण्याच्या बाहेर रात्रभर शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. पोलिसांकडून या मुलींचा शोध घेण्यात येत आहे.
मुंबई : आठवीत शिकणाऱ्या पाच विद्यार्थिनी शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता झाल्याची घटना मुंबईत घडली आहे. मुली बेपत्ता झाल्याचं समोर आल्यानंतर कुलाबा पोलीस ठाण्याच्या बाहेर रात्रभर शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, या विद्यार्थिनी आठवीत शिकत आहेत. या विद्यार्थिनींचा काल ओपन डे म्हणजे परीक्षेचा निकाल होता. त्यात मुलींना परीक्षेत गुण कमी मिळाल्याने त्या नाराज झाल्या. त्यांची शाळा दुपारी अडीच वाजता सुटते, मात्र शाळा सुटल्यावरही मुली घरी आल्या नाहीत.
चिंताग्रस्त पालकांनी थेट शाळेत आणि नंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली. कुलाबा पोलिसांची विविध पथके या मुलींचा शोध घेत आहेत. आतापर्यंत सर्व विभागांसह, समुद्र किनारे देखील शोधून झाले आहेत. त्यामुळे आता पालकांची चिंता अजून वाढली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement