एक्स्प्लोर
मुंबईत देशातल्या पहिल्या सी प्लेनची चाचणी
या विमानाची विशेषता म्हणजे जमीन आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणी हे विमान लँड करता येतं.
मुंबई : देशातलं पहिलंवहिलं सी प्लेन मुंबईतील गिरगाव चौपाटीवर उतरलं. गिरगाव चौपाटीवर या सी प्लेनचं पहिलं प्रात्याक्षिक पार पडलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय उड्डाण वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू हे उपस्थित होते.
या विमानाची विशेषता म्हणजे जमीन आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणी हे विमान लँड करता येतं. स्पाईसजेट कंपनीची ही सी प्लेन आहेत. अशी तब्बल 100 सी प्लेन सुरु करण्याचा स्पाईसजेटचा विचार आहे.
https://twitter.com/ANI/status/939475561885286400
या विमानात 10 ते 14 जण प्रवास करु शकतात. सी प्लेनमुळे प्रादेशिक कनेक्टीव्हिटी वाढण्यास मदत होईल. शिवाय आपत्कालीन परिस्थितीतही या विमानाचा वापर करता येईल. पर्यटन विकासालाही याचा फायदा होईल, असं स्पाईसजेटने म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement