अंधेरीतील गोखले रेल्वे उड्डाणपुलाचा पहिला गर्डर स्थापित, पहिल्या टप्प्यातील काम 15 फेब्रुवारीपर्यंत होणार पूर्ण
अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणारा गोखले पूलाचा गर्डर यशस्वी लॉन्च करण्यात आला आहे.
मुंबई : अंधेरी पूर्व- पश्चिमेला (Andheri East- West) जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पुलाचा (Andheri Gokhale Bridge) पहिला गर्डर बसवण्याचे काम शनिवारी मध्यरात्री पार पडलं. दरम्यान मोठ्या उत्साहात फटाक्याची आतषबाजी करत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जय श्रीरामचे नारे देत एकमेकांना अभिनंदन केलं. या पुलाचं पहिल्या टप्प्यातील काम 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत पूर्ण होणर आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरीतील एक महत्त्वाचा पूर्व-पश्चिमेला जोडणारा गोखले पूल आहे. मुंबई महानगरपालिकेने काही दिवसापूर्वी मध्यरात्री गोखले पुलाच्या गर्डर्सची ट्रायल रन यशस्वी झाल्यामुळे शनिवारी मध्यरात्री गर्डर स्थापित करण्यासाठी विशेष चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता. अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणारा गोखले पूलाचा गर्डर यशस्वी लॉन्च करण्यात आला आहे.
15 फेब्रुवारी 2024 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता
गोखले ब्रिजच्या निर्मितीसाठी ओपन वेब गर्डर बसविण्यात आलेला आहे. हा संपूर्ण गर्डर 90 मीटर लांबीचा पूल साडेतेरा मीटर रुंद आहे आणि सुमारे 1300 टन वजनी गर्डरची उभारणी करणे, गर्डर उत्तरेकडे सरकवणे आणि गर्डर सरकवल्यानंतर तो 7.5 मीटर खाली आणणे आदी कामे करावी लागणार आहेत. पहिल्या गर्डरच्या कामाची जबाबदारी रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमावर सोपवण्यात आली आहे. पुढील दोन महिन्यांत ते पूर्ण करण्याचे बीएमसीचे उद्दिष्ट आहे. या पुलाच्या प्रवेश मार्गिकांचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. गर्डर बसवल्यानंतर त्यावर सळयांचे काम करून सिमेंट-काँक्रिटीकरण करण्यात येईल. नंतर अन्य कामे पूर्ण केली जातील.या पुलाचे पहिल्या टप्प्यातील काम 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे नववर्षात गोखले पूलची एक मार्गीका नागरिकांसाठी खुली होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गोखले पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक
अंधेरी येथील गोपालकृष्ण गोखले पुलाचा पहिला गर्डर स्थापन करण्यासह पुलाच्या इतर कामांची प्रगती जाणून घेण्याच्या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी नुकतीच प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी भेट देवून पाहणी केली होती. गोखले पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामध्ये कोणताही विलंब होवू नये, तसेच अवाढव्य गर्डर स्थापन करण्याची सगळी कामे महानगरपालिका आणि रेल्वेच्या समन्वयातून अचूकपणे पार पडावीत, यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू आणि त्यांची प्रशासन प्रारंभापासून प्रयत्न करीत आहे.
हे ही वाचा :