मोठी बातमी! मुंबईत आढळला जीबीएसचा पहिला रुग्ण, सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू
मुंबईच्या अंधेरी पूर्व (Mumbai Andheri East) परिसरात एका पुरुषाला दुर्मिळ मज्जातंतू विकार म्हणजेच गुडलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
मुंबई : मुंबईच्या अंधेरी पूर्व (Mumbai Andheri East) परिसरात एका पुरुषाला दुर्मिळ मज्जातंतू विकार म्हणजेच गुडलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरी परिसरात राहणारा हा व्यक्ती असून त्याच्यावर महापालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अंधेरी पूर्व परिसरात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळल्यामुळं अंधेरी पूर्व विधानसभेचे आमदार मुरजी पटेल (Murji Patel) यांनी सेव्हन हिल्स रुग्णालयात जाऊन रुग्णाची भेट घेतली. तसेच रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना भेटून या ठिकाणी जीबीएस रुग्णांसाठी 50 विशेष बेड राखीव ठेवण्याची सूचना केली. शिवाय या रुग्णांवर महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत मोफत उपचार करण्याच्या सूचना देखील केल्या आहेत.
मुंबईकरांची चिंता वाढली
पुणेकरांची चिंता वाढवलेल्या जीबी सिंड्रोमचा आता मुंबईमध्ये शिरकाव झाला आहे. जीबी सिंड्रोमचा मुंबईत पहिला रुग्ण आढळला आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. पुण्यामध्ये जीबी सिंड्रोम आजाराचा वेगाने प्रसार होत आहे. आतापर्यंत मुंबईत या आजाराचा एकही रुग्ण आढळला नव्हता. पण आता मुंबईत पहिला रुग्ण आढळला आहे त्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. बईच्या अंधेरी पूर्व परिसरात एका पुरुषाला दुर्मिळ मज्जातंतू विकार म्हणजेच गुडलेन बॅरे सिंड्रोम जीबीएस आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरी परिसरात ही व्यक्ती राहते. या व्यक्तीवर सध्या महापालिकेच्या सेवन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुण्यामध्ये जीबी सिंड्रोमची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पुण्यात रुग्णांचा आकडा 173 वर पोहचला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात 170 संशयीत जीबीएस बाधित रुग्णांपैकी १४० रुग्णांना जीबीएस झाल्याचे निदान निश्चित झाले आहे. 21 रूग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. या आजारामुळे आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे.
'जीबीएस' आजार नेमका काय?
गुलेन बॅरी सिंड्रोममध्ये बाहेरील विषाणू किंवा जिवाणूंवर हल्ला करणारी शरीरातील रोगप्रतिकारशक्तीच मज्जासंस्थेवर हल्ला करते. त्यामुळे मेंदूकडून शरीरातील इतर अवयवांना मिळणारे संकेत कमी होतात, असे या आजाराचे स्वरूप आहे. स्नायू कमकुवत होऊ शकतात. हाता-पायातील संवेदना कमी होऊ शकते. गिळताना किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. प्रौढांमध्ये आणि पुरुषांमध्ये ही समस्या अधिक असून, सर्वच वयोगटांतील लोकांना याचा त्रास होऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या:
Guillain Barre Syndrome : जीबीएसच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका अलर्ट मोडवर; दोन रुग्णालयात विशेष कक्ष, आजारापासून बचावासाठी अशी घ्या काळजी
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
