एक्स्प्लोर
मुंबईत पश्चिम द्रुतगती महामार्गावर चालत्या कारला आग

मुंबई : मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर चालत्या गाडीने भररस्त्यात पेट घेतला आहे. त्यामुळे अंधेरीकडून बोरीवलीच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. अंधेरीकडून बोरीवलीच्या दिशेने जाणाऱ्या होंडा सिटी झेडएक्स गाडीने जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान अचानक पेट घेतला. भररस्त्यात गाडी पेटल्यानं वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. त्यामुळे साऊथ बाऊंड रस्त्यानं वाहतूक वळवण्यात आली आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
भविष्य
महाराष्ट्र






















