एक्स्प्लोर

फायनान्स कंपनीच्या संचालकांचं अपहरण, ठाण्यात 6 जण अटकेत

उदयपूरमध्ये राहणाऱ्या देवानंद वरंदानी आणि रोनक सैनी या दोघा व्यापाऱ्यांचं ठाण्यात अपहरण करण्यात आलं होतं.

ठाणे : राजस्थानच्या उदयपूरमधील फायनान्स कंपनीच्या दोघा संचालकांचं अपहरण करुन एक कोटीची खंडणी मागणाऱ्या कथित पत्रकारासह सहा जणांना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. या टोळीच्या तावडीतून दोघा संचालकांची सुखरुप सुटका करण्यात आली. खंडणीसाठी उकळलेले 25 लाख रुपये, पाच तलवारी आणि एक गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे. लेनिन मुरली कुट्टीवटे (40, कोलशेवाडी, कल्याण), रोहित राजाराम शेलार (20, कल्याण), सागर साळवे (37, दिवा सागवे गाव), ओमप्रकाश जैस्वाल (23, लोकमान्य नगर, ठाणे), अभिषेक झा (40, कल्याण) आणि तुकाराम कुशाबा मुदगन (43, कल्याण) अशी अटक केलेल्या सहा खंडणीखोरांची नावं आहेत. साळवे हा 'पोलिस महानगर' नामक एका साप्ताहिकाचा पत्रकार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली. सर्व आरोपींना ठाणे न्यायालयाने शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. उदयपूरमध्ये राहणाऱ्या देवानंद वरंदानी आणि रोनक सैनी या दोघा व्यापाऱ्यांची 'श्री तिरुपती फायनानिक्स निधी लिमिटेड' नावाची कंपनी असून ते प्रॉपर्टी गहाण ठेवून कर्ज देतात. या कंपनीचा नंबर मिळवून आरोपींनी दोघांशी संपर्क साधला आपण बांधकाम व्यावसायिक असल्याचं आरोपींनी भासवलं. आपल्याला बांधकामासाठी मोठं कर्ज हवं असल्याचं सांगून दोघांना ठाण्यात प्रॉपर्टी दाखवण्यासाठी बोलावण्यात आलं. दोन्ही संचालक सात सप्टेंबरला ठाण्यात आल्यावर त्यांचं स्टेशनसमोर असलेल्या अशोक टॉकीज परिसरातून अपहरण करण्यात आलं. त्यानंतर त्यांना डोंबिवलीतील एका इस्टेट एजंटच्या कार्यालयात नेण्यात आलं. दोघा संचालकांना तलवारीचा धाक दाखवून त्यांच्याकडून एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी आरोपींनी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. खंडणीची रक्कम तडजोडी अंती 25 लाख रुपये ठरवण्यात आली. त्याप्रमाणे अपहरण केलेल्या व्यापाऱ्यांच्या एका मित्राला 25 लाखांची रोकड घेऊन आरोपींनी कल्याणला बोलवलं. रोकड घेऊन आलेल्या व्यक्तीला आरोपींनी 8 सप्टेंबरला संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास कल्याणला आपल्या गाडीत बसवलं. पैसे घेऊन आलेल्या व्यक्तीने चतुराईने आरोपींच्या कारचा क्रमांक आपल्या बोरीवलीतील मित्राला पाठवला. संबंधित मित्राने ही घटना त्वरित ठाणे खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांना सांगितली. त्यानंतर ठाणे खंडणी विरोधी पथकाने सापळा लावून कल्याणमधून त्यांची कार ताब्यात घेतली. त्यातून लेनिन मुरली कुट्टीवटे आणि रोहित राजाराम शेलार या दोघा आरोपींना अटक केली. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार दोघा व्यापाऱ्यांची सुटका पोलिसांनी केली. याचवेळी पोलिसांनी घटनास्थळावरुन 5 तलवारी, एक कार, व्यापाऱ्यांकडून घेतलेली 70 हजारांची रोकड, एक चेन, एक अंगठी असा ऐवज जप्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray and Sonam Wangchuk: प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती, सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
Neeta Ambani Talks In Marathi At Ajay Atul Live Show: अजय-अतुलच्या कॉन्सर्टमध्ये नीता अंबानींची एन्ट्री, प्रेक्षकानं डिवचताच अस्खलित मराठीत उत्तर दिलं, एकाच वाक्यानं टाळ्यांचा कडकडाट, VIDEO
अजय-अतुलच्या कॉन्सर्टमध्ये नीता अंबानींची एन्ट्री, प्रेक्षकानं डिवचताच अस्खलित मराठीत उत्तर दिलं, एकाच वाक्यानं टाळ्यांचा कडकडाट, VIDEO
Mumbai AC Local: गर्दीच्या वेळी लोकलमधील एसी पडला बंद , 15 मिनिटं मुलुंड स्थानकावर ठप्प; प्रवासी गुदमरून बेशुद्ध पडले, नेमकं काय घडलं?
गर्दीच्या वेळी लोकलमधील एसी पडला बंद , 15 मिनिटं मुलुंड स्थानकावर ठप्प; प्रवासी गुदमरून बेशुद्ध पडले, नेमकं काय घडलं?
Vinayak Raut : सूनेच्या आरोपानंतर विनायक राऊतांसह लेकाविरोधात गुन्हा दाखल; तर तिकडे विनंती फेटाळून पोलिसांनीही संरक्षण काढलं
सूनेच्या आरोपानंतर विनायक राऊतांसह लेकाविरोधात गुन्हा दाखल; तर तिकडे विनंती फेटाळून पोलिसांनीही संरक्षण काढलं

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray and Sonam Wangchuk: प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
प्राणांतिक उपोषण सोडण्याची विनंती सोनम वांगचूक उद्धव ठाकरेंना म्हणाले, 'माझं काहीही झालं तरी चालेल, पण देशाचं भलं झालं पाहिजे'
राम मंदिरातील लुटीवर 'सर्वोच्च' प्रहार! सुप्रीम कोर्टाने SIT रिपोर्ट मागितला, यूपी-केंद्र सरकार, ट्रस्टला सद्धा नोटीस धाडली, CCTV सुरक्षित ठेवण्याचे निर्देश
राम मंदिरातील लुटीवर 'सर्वोच्च' प्रहार! सुप्रीम कोर्टाने SIT रिपोर्ट मागितला, यूपी-केंद्र सरकार, ट्रस्टला सद्धा नोटीस धाडली, CCTV सुरक्षित ठेवण्याचे निर्देश
Jejuri Varkari Accident: जेजुरीत वारीतील माऊलींचा अपघात; चालकाला तापाच्या गोळ्यांमुळे ग्लानी आली अन् नियंत्रित ट्रक थेट वारकऱ्यांच्या गर्दीत शिरला, तिघांचा अंत
जेजुरीत वारीतील माऊलींचा अपघात; चालकाला तापाच्या गोळ्यांमुळे ग्लानी आली अन् नियंत्रित ट्रक थेट वारकऱ्यांच्या गर्दीत शिरला, तिघांचा अंत
'एकतर आपण 'विश्वगुरू-विश्वगुरू' असं म्हणणं बंद तरी केलं पाहिजे, नाहीतर मग सगळा मूर्खपणा थांबवला पाहिजे..' अनुराधा पौडवाल का संतापल्या?
'एकतर आपण 'विश्वगुरू-विश्वगुरू' असं म्हणणं बंद तरी केलं पाहिजे, नाहीतर मग सगळा मूर्खपणा थांबवला पाहिजे..' अनुराधा पौडवाल का संतापल्या?
Video: सुसाट स्कॉर्पिओ थेट धावत्या डंपरमध्ये मागून घुसली, पाच जणांचा मृत्यू; बचावासाठी जीवाच्या आकांताने किंकाळ्या, देवदर्शन करून परत येताना काळाचा घाला
Video: सुसाट स्कॉर्पिओ थेट धावत्या डंपरमध्ये मागून घुसली, पाच जणांचा मृत्यू; बचावासाठी जीवाच्या आकांताने किंकाळ्या, देवदर्शन करून परत येताना काळाचा घाला
SIR In Maharashtra: मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
मतदार यादीत आपले नाव नोंदवणाऱ्या प्रत्येक नवीन मतदाराला त्यांच्या पालकांचा SIR तपशील द्यावा लागणार! निवडणूक आयोगाने हा नियम का केला?
Vinayak Raut on Girija Raut: गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांमागे मोठे राजकीय षडयंत्र? विनायक राऊतांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, 'मागील महिन्यातच आमची...'
गिरीजा राऊतांच्या गंभीर आरोपांमागे मोठे राजकीय षडयंत्र? विनायक राऊतांचा खळबळजनक खुलासा; म्हणाले, 'मागील महिन्यातच आमची...'
Sanjay Raut: सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
सोनम वांगचूक शरीराने कोसळले, सरकारला बळी हवाय, त्यांना लढणारे लोक नको आहेत, तुरुंगात टाकता येत नसल्याने असं मारू इच्छित; संजय राऊतांचा सडकून प्रहार
Embed widget