एक्स्प्लोर
भाजपाचे आमदार नरेंद्र मेहतांवर खंडणीचा गुन्हा दाखल
मीरा-भाईंदर: मीरा भाईंदरमध्ये पुन्हा एकदा भाजप नेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नगरसेवक अनिल भोसले यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरा-भाईंदर रोडवरील ब्रह्मदेव मंदिरासमोर बांधकाम व्यावसायिक विनोद त्रिवेदी यांचं इमारत बांधण्याचं काम सुरू आहे. इमारतीच्या वरच्या बांधकामाला परवानगी देण्यासाठी मेहता यांनी दोन कोटींची खंडणी मागितल्याची तक्रार त्रिवेदी यांनी केली आहे.
त्रिवेदीनीं न्यायलयातून आदेश आणल्यानंतर नयानगर पोलिसांनी नरेंद्र मेहता, पालिकेचे नगर रचना विभागाचे दिलीप घेवारे यांच्यासह इतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, आमदार मेहता यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर लावलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. त्रिवेदीचं बांधकाम अनधिकृत असून त्यावर कारवाई होऊ नये यासाठी माझ्यावर खोटे आरोप लावल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तर त्रिवेदी आणि पोलिसांनी याबाबत कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement