एक्स्प्लोर
Advertisement
कुजलेलं, खराब चिकन चायनीज गाड्यांवर, FDA ची धाड
शिवडीतल्या एका अनधिकृत झोपडीत 25 किलो खराब चिकन आढळून आलं. हे खराब चिकन चायनीजच्या गाड्यांवर 30 रुपये किलो दरानं विकलं जात होतं.
मुंबई: रस्त्यांवरील गाड्यांवर तुम्ही चायनीज खात असाल, तर ही बातमी वाचून तुम्हाला धक्का बसाल. शिवडी परिसरात अन्न आणि औषध प्रशासनानं मोठी कारवाई केली. शिवडीतल्या एका अनधिकृत झोपडीत 25 किलो खराब चिकन आढळून आलं. हे खराब चिकन चायनीजच्या गाड्यांवर 30 रुपये किलो दरानं विकलं जात होतं.
हे चिकन कुजलेल्या अवस्थेत होतं. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, आर ए किडवई नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चायनीजच्या गाड्यांवर पदार्थांमध्ये वापरलं जाणारं चिकन हे निकृष्ट, कुजलेल्या, खराब कोंबड्यांचं असल्याचं आढळून आलं. शिवडीत ज्या झोपडपट्टीत हे चिकन पकडलं ते तब्बल 25 किलो खराब, कुजलेलं चिकन होतं.
काही दिवसांपूर्वीच शहापूर तालुक्यातील खर्डी येथे चायनीजचे काही पदार्थ खाल्ल्याने जवळपास 30 जणांना विषबाधा झाली होती. त्यामुळे तुम्ही जर गाड्यांवर चायनीज खात असाल, तर सावधान.
खादाडखाऊ : चायनीज गाड्यांवरचे खाणे आणि अर्थकारण
जगभरात चायनीज नव्हे, तर इंडियन फूडच भारी!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement