एक्स्प्लोर
विरारमध्ये बापलेकाची निर्घृण हत्या, मारेकरी फरार
दोन्ही मृतदेहांच्या तोंडाला सेलोटेप लावली होती आणि हात दोरीनं बांधले होते. त्यामुळे ही हत्या एकाच व्यक्तीनं केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
विरार : विरारमध्ये बापलेकाच्या हत्येनं एकच खळबळ माजली आहे. काल (मंगळवार) सायंकाळी मुलाचा तर आज दुपारी वडिलांचा मृतदेह पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर सापडला. दोघांची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली हे अद्याप समजू शकलेलं नाही.
चंद्रकात करगल असं वडिलांचं नाव असून हर्ष करगल असं मुलाचं नाव आहे. ते दोघेही सहकार नगरमधील ओम अपार्टमेंन्टमध्ये राहत होते.
बँकेचं काम आटोपून मुलगा हर्ष यालाही शाळेतून घरी येऊन येतो असं सांगून चंद्रकांत हे 25 सप्टेंबरला घराबाहेर पडले. परंतु दोघेही रात्री उशिरापर्यंत घरी आलेच नाही. त्यामुळे चंद्रकांत यांच्या पत्नीनं विरार पोलीस ठाण्यात दोघंही बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
मंगळवारी दहिसर गावच्या तलावात हर्षचा मृतदेह सापडला तर आज म्हाडा कॉलनीच्या मोठ्या नाल्यात चंद्रकात करगल यांचा मृतदेह आढळला.
दोन्ही मृतदेहांच्या तोंडाला सेलोटेप लावली होती आणि हात दोरीनं बांधले होते. त्यामुळे ही हत्या एकाच व्यक्तीनं केल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हत्या अनैतिक संबध किंवा अार्थिक व्यवहारातून झाली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलीस सध्या मारेकऱ्यांचा कसून शोध घेत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement