एक्स्प्लोर

फेसबुकवरील अनोळखी तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट महागात, अडीच कोटींना गंडवले

फेसबुकवर एखाद्या अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करणे किती महागात पडू शकते, याचं उदाहरण कल्याणमध्ये समोर आले आहे.

कल्याण : फेसबुकवर एखाद्या अनोळखी व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट करणे किती महागात पडू शकते, याचं उदाहरण कल्याणमध्ये समोर आले आहे. एका अनोळखी परदेशी महिलेच्या बोलण्यात फसून दूतावासात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याने तब्बल अडीच कोटी रुपये गमावले आहेत. स्वप्नील धामणकर असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. कल्याणच्या खडकपाडा परिसरात राहणारे स्वप्नील धामणकर हे थाय दूतावसात व्हिसा ऑफिसर म्हणून काम करतात. त्यांना ऑगस्ट 2017 मध्ये फेसबुकवर मरियम खुर्शीद नावाच्या अनोळखी परदेशी महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली. त्यांनी ती अॅक्सेप्टही केली. त्यानंतर धामणकर आणि या महिलेने फेसबुकवरुन चॅटिंग सुरु केले. या महिलेने धामणकर यांना चॅटिंग करताना सांगितले की, माझे पती अमेरिकन सैन्यात होते आणि त्यांचे निधन झाले आहे. परंतु पतीच्या निधनानंतर माझा दिर माझ्यावर लग्नासाठी दबाव टाकत असून त्यानं मला तेहरानमध्ये बोलावून घेतले आहे. परंतु मला तेहरानमध्ये न जाता भारतात येऊन पुढील आयुष्य घालवायचे आहे. त्यानंतर या महिलेने धामणकर यांना विनंती केली की, मला भारतात येऊन राहायचे असून त्यासाठी तुम्ही माझी मदत करा धामणकर यांनी तिच्यावर विश्वास ठेवला. धामणकरांनी तिला विचारले की, काय मदत हवी आहे. यावर तिने सांगतले की, माझ्या पतीने माझ्यासाठी 18 लाख डॉलर्स ठेवले आहेत. हे पैसे मी तुम्हाला पाठवते. तुम्ही हे पैसे मला भारतीय चलनात कनव्हर्ट (रुपांतरित) करुन द्या. त्यानंतर धामणकर यांनी तिची मदत करण्याचे ठरवले. अडीच कोटी लुटले मरियमला मदत करतो असे आश्वासन दिल्यानंतर धामणकर यांना ऑगस्ट 2017 मध्ये एका अनोळखी इसमाचा फोन आला, तो कस्टम ऑफिसर असल्याचे त्याने सांगितले. त्याने धामणकरांना सांगितले की, तुमचे पार्सल आले आहे. ते पार्सल घेण्यासाठी कर म्हणून 6 लाख 80 हजार रुपयांची मागणी केली. हे पैसे धामणकर यांनी ऑनलाईन पद्धतीने त्याला दिले. 6.80 लाख रुपये दिल्यानंतर त्याच दिवशी मध्यरात्री एक नायजेरियन इसम येऊन धामणकर यांना एक तिजोरी देऊन गेला, ज्यात डॉलर्सची सोळा काळी बंडले होती. स्कॅनिंगमध्ये पैसे दिसू नये, म्हणून त्याला एक विशिष्ट प्रकारचं केमिकल लावले असून ते काढण्यासाठी वेगळे केमिकल घ्यावं लागेल, असे त्या इसमाने धामणकर यांना सांगितले. त्या इसमाने एक लिटर केमिकल आणि पावडर खरेदी करण्यासाठी धामणकर यांच्याकडून तब्बल ४० लाख रुपये उकळले. त्याने सॅम्प म्हणून आणलेल्या केमिकलने पाच नोटांचा काळा रंग धामणकर यांना काढून दाखवला. परंतु इतर नोटांचा रंग निघत नसल्याने पुन्हा एकदा एक टेक्निशियन धामणकर यांच्या घरी आला आणि त्याने काही नोटांना केमिकल लावून त्या फ्रीजमध्ये ठेवल्या. या मोबदल्यात त्याने पुन्हा एकदा धामणकर यांच्याकडून ४२ लाख रुपये उकळले. परंतु नोटांचा रंग काही बदललाच नाही. शेवटी या सर्व प्रकाराने वैतागलेल्या धामणकर यांनी मरियमला फोन करून ही बाब सांगितली. त्यावर मरियमने आपण भारतात येत असल्याची बतावणी करत धामणकर यांच्याकडून तिकिटासाठी एक लाख रुपये उकळले. यानंतर मात्र तिचा फोन बंद झाला. या सर्व प्रकारानंतर धामणकर यांना त्यांची फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहे कदम यांनी याबाबत सांगितले की, मरियमची मदत करण्याच्या नादात धामणकर यांनी त्यांचे राहते घर विकलके आहे. धामणकर यांचे पैसे आणि घर हातून गेले असून त्यांच्याकडे आता काळे कागद उरले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Ghatkoper Ashok Nagar Landslide: मुंबईच्या घाटकोपरमधील गौसिया चाळीवर डोंगराचा भाग कोसळला; तीन घरांवर दरड पडली, NDRF आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू
मुंबईच्या घाटकोपरमधील गौसिया चाळीवर डोंगराचा भाग कोसळला; तीन घरांवर दरड पडली, NDRF आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू
Tukaram Mundhe FDA : तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
तुकाराम मुंढेंचा औषध कंपन्यांवर हातोडा! 'या' 10 आयुर्वेदिक कंपन्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Tukaram Mundhe FDA : तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget