एक्स्प्लोर
मोबाईल-हेडफोनचा अतिरेक, तरुणाई बहिरेपणाच्या मार्गावर
मोबाईल आणि हेडफोनच्या अतिरेकामुळे तरुण वयातच अनेक जण ठार बहिरे होण्याच्या मार्गावर आहेत.
मुंबई : गावात एकवेळ पाणी नसेल, पण प्रत्येक घरात मोबाईल हा हवाच अशी परिस्थिती आहे. या मोबाईल आणि हेडफोनच्या अतिरेकामुळे तरुण वयातच अनेक जण ठार बहिरे होण्याच्या मार्गावर आहेत.
कानाचे पडदे फाटेपर्यंत ढिंच्याक गाणी ऐकणं, तासनतास हेडफोन घालून फिल्म्स पाहणं आणि डोक्याला मुंग्या आणतील असे गेम्स खेळणं... डोकी निमूटपणे खाली घालून मोबाईलमध्ये हरवलेली माणसे ही नित्याचीच... पण त्यामुळे आपण काय गमावत आहोत, याची आपल्याला कल्पना नाही.
हेडफोनवर गाणी ऐकणं हा स्लो पॉईझन सारखा प्रकार आहे. कारण मोबाईलमध्ये गुंग असलेल्या तरुणांना त्याचे परिणाम उशिरा जाणवतात. स्मार्टफोनमध्ये अडकून पडलेल्या स्मार्ट तरुणाईला आता यापासून स्वतःला दूर करण्याची आवश्यकता आहे.
मोबाईल पूर्णपणे टाळणं अशक्य आहे. पण किमान त्याचा वापर कमी करुन आपल्या इंद्रियांना तरी जपणं आपल्या हातात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जालना
भविष्य
भारत
कोल्हापूर
Advertisement