Mumbai : मुंबईत अवजड वाहनांना प्रवेशबंदी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाचा निर्णय
Mumbai Traffic Police : मुंबईमध्ये (Mumbai) अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांकडून (Mumbai Traffic Police ) याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
मुंबई : 4, 5, 6 आणि 9 सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये (Mumbai) अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यामध्ये भाजीपाला, दूध, ब्रेड आणि बेकरी पदार्थ वाहून नेणारी वाहने, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, पेट्रोल, डिझेल, केरोसीन टँकर्स तसेच रुग्णवाहिका, शासकीय व निमशासकीय वाहने, स्कूल बस यांना सूट देण्यात आली आहे. परंतु, इतर जड वाहनांना या दिवशी मुंबईत प्रवेश करता येणार नाही. मुंबई वाहतूक पोलिसांकडून (Mumbai Traffic Police ) याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या कालावधीत राज्यभर गणेशोत्सव (Ganesh Chaturthi 2022) साजरा होत आहे. मुंबईत देखील मोठ्या उत्साहात गणेशोत्सवात साजरा केला जात आहे. 4 सफ्टेंबर रोजी पाच दिवसाच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. तर 5 सप्टेंबर रोजी गौरी-गणपतीचे विसर्जन, 6 सप्टेंबर रोजी सात दिवसांच्या गणपतीचे विसर्जन आहेणार आहे. तर 9 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी दहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे. या विसर्जनाच्या दिवशी वाहतूक आणि गणपती मिरवणुकांना वाहतुकीची समस्या भेडसावू नये यासाठी मुंबई पोलिसांनी अवजड वाहनांना प्रवेश बंद केला आहे.
दि. ४, ५, ६ आणि ९ सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे. यामध्ये भाजीपाला, दूध, ब्रेड व बेकरी पदार्थ वाहून नेणारी वाहने, पिण्याच्या पाण्याचे टँकर्स, पेट्रोल, डिझेल, केरोसीन टँकर्स तसेच रुग्णवाहिका, शासकीय व निमशासकीय वाहने, स्कूल बस यांना सुट देण्यात आली आहे. pic.twitter.com/CvytOc1KFy
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) September 3, 2022
कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्वच सण-उत्सवांवर निर्बंध होते. परंतु, आता कोरोनातून थोडाफार दिलासा मिळाल्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवावर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. दोन वर्षांच्या निर्बंधमुक्तीमुळे भाविक देखील मोठ्या उत्साहत यंदाचा गणेशोत्सव साजरा करत आहेत. त्यामुळेच गणपती विसर्जन सोहळा निर्विघ्न पार पडावा, तसेच विसर्जनावेळी मुंबईत कोणत्या ही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुंबईत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
दोन वर्षानंतर यंदा प्रथमच गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून देशभर निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे सण-उत्सव साजरे करता आले नाहीत. आता कोरोना महामारीतून दिलासा मिळाला आहे. त्यामुळे यंदा सर्वच सणांवरील निर्बंध हटवण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव हा निर्बंधमुक्त साजरा होत आहे. त्यातच मुंबईत गणेशोत्सव अगदी धुमधडाक्यात साजरा केला जातो. त्यामुळे मुंबईकरांना गणपती विसर्जना दिवशी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी मुंबईत अवजड वाहांना बंदी करण्यात आली आहे.