Mumbai IIT: मुंबई IIT मध्ये गर्भ विज्ञान सेमिनार, नाजूक विषयाला काहींचा विरोध, काहींचं समर्थन, सेमिनारमध्ये नेमकं काय?
Mumbai IIT: मुंबई आयटीतील आयआयटीतील सेंटर ऑफ संस्कृत लर्निंग यांच्या माध्यमातून 'टॉक ऑन गर्भ विज्ञान' या सेमिनारचं आयोजन करण्यात आला आहे.
मुंबई: मुंबई आयआयटीत (Mumbai IIT) होणाऱ्या गर्भ विज्ञान सेमिनारला काहींनी विरोध दर्शवला आहे, तर काहींनी याबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. "गर्भ विज्ञाना"वर सेमिनार, मुंबई आयआयटीतील काही विद्यार्थ्यांचा सेमिनारच्या विषयाला विरोध दर्शवला आहे. तर काही जणांकडून मुंबई आयआयटीत गर्भ विज्ञानावर होत असलेल्या चर्चेवर आश्चर्य व्यक्त होत आहे. मुंबई (Mumbai IIT) आयआयटीतील सेंटर ऑफ संस्कृत लर्निंग यांच्या माध्यमातून ' टॉक ऑन गर्भ विज्ञान' या सेमिनारचं आयोजन करण्यात आला आहे. या सेमिनारमध्ये मुख्यत्वे करून चांगल्या आणि योग्यरीत्या गर्भधारणा करण्यासंदर्भातला विज्ञान कशा पद्धतीचा आहे यावर चर्चा केली जाणार आहे.
18 तारखेला सायंकाळी पाच ते सात मुंबई आयआयटीतील कॅम्पसमध्ये या सेमिनारचा आयोजन करण्यात आला असून संस्कृती आर्या गुरुकुलमचे आचार्य मेहुल शास्त्री हे सेमिनार मध्ये संबोधित करणार आहेत . मुंबई आयआयटीतील कार्यक्रमासंदर्भात सर्व विद्यार्थ्यांना ईमेल करून कळवण्यात आले आहे
आयआयटीतील गर्भ विज्ञानाच्या सेमिनारमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?
1. मुलाच्या अंतर्गत आणि बाह्य गुणांवर परिणाम करणारे घटक
2. आपल्या पूर्वजांचा मुलाच्या गुणांवर कसा प्रभाव पडतो
3. गर्भधारणेदरम्यान आई आणि गर्भाचे आरोग्य
4. गर्भधारणेपूर्वी मन आणि शरीराची तयारी
5. गर्भधारणेदरम्यान निष्काळजीपणाचे परिणाम
6. गर्भसंस्काराचे काही नियम
या सगळ्या विषयासंदर्भात या सेमिनारमध्ये चर्चा केली जाणार असल्याचं ईमेल मध्ये सांगण्यात आलं आहे. गर्भ विज्ञानाच्या या सेमिनारला काही मुंबई आयआयटी मधील विद्यार्थ्यांनी विरोध केला असून स्यूडोसायन्सला म्हणजेच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा आधार नसताना विज्ञान म्हणून विषय समोर मांडला जात असून त्याला एक प्रकारे मुंबई आयआयटीमध्ये थारा देत असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.
मुंबई आयआयटी कडून सांगण्यात आले की, आयुर्वेदातील तज्ञांकडून हा सेमिनार घेतला जाणार आहे. योग्य प्रकारे माहिती गर्भ विज्ञानाविषयी दिली जाणार आहेत. सेमिनार मध्ये भारतीय ज्ञान विज्ञानाचे विश्लेषण आणि चर्चा केली पाहिजे आणि तशाच प्रकारचा हा सेमिनार असणार आहे. या सेमिनारसाठी संशोधक, लहान मुलांचे पालक, प्रौढ व्यक्ती आणि शिक्षक यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI