एक्स्प्लोर

Narendra Modi: जगभरात मोदींचे भक्त, दावोसमध्ये परदेशी लोकांनी विचारलं, तुम्ही मोदींसोबत आहात का? मी म्हणालो, मी त्यांचाच माणूस: एकनाथ शिंदे

Eknath Shinde On PM Narendra Modi: विकासकामांचे उद्धाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होऊ नये अशी अनेकांची इच्छा होती, पण नियतीसमोर कुणाचं काही चालत नाही असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. 

मुंबई:  आज मुंबईमध्ये मेट्रोचं  उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विकासकामांचा पाढा मोदींसमोर वाचला. तसेच मोदींवर देखील स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. यावेळी त्यांनी दावोसमध्ये घडलेला एक प्रसंग सांगत मोदींची स्तुती केली. जागतिक आर्थिक परिषदेसाठी दावोसमध्ये गेलो होतो, त्या ठिकाणीही मोदींचीच हवा होती, अनेक देशाच्या पंतप्रधानांनी फक्त मोदींबद्दलच विचारलं असं मुख्यमत्री शिंदे म्हणाले. दावोसमध्येही मोदींचे भक्त असल्याचं मला जाणवलं असंही ते म्हणाले. येत्या काळात मोदींच्या नेतृत्वाखाली मुंबईचा चेहरामोहरा बदलून टाकणार असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. मुंबईतील अंधेरी-दहिसर मेट्रो आणि विविध विकासकामांच्या उद्धाटनासाठी नरेंद्र मोदी आज मुंबईत आले आहेत. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दावोसमधील आर्थिक परिषदेसाठी गेले होते. त्यावेळी आलेला अनुभव त्यांनी सांगितला. मुख्यमंत्री म्हणाले की, "दावोसमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी अनेक देशांचे पंतप्रधान भेटले, अधिकारी भेटले. त्या ठिकाणी लक्झमबर्गचे  (Luxembourg) पंतप्रधान भेटले आणि त्यांनी मोदींचे भक्त असल्याचं सांगितलं. तसेच त्यांनी माझ्यासोबत फोटो काढला. काही जर्मन नागरिकांनी विचारलं की तुम्ही मोदींसोबत आहात का? त्यावेळी मी म्हणाले की मी त्यांचाच माणूस आहे."

नियतीसमोर कुणाचं काही चालत नाही, मुख्यमंत्र्यांचा महाविकास आघाडीला टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचा विकास किती झाला ते आपल्याला माहिती आहे. अगदी ठप्प झालेल्या कामांना चालना देण्यासाठी आणि लोकोपयोगी योजनांचा गुदमरलेला श्वास मोकळा करण्याची संधी आम्हाला मिळाली ती केवळ नरेंद्र मोदींच्यामुळे अशी स्तुतीसुमनं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांवर उधळली. काही लोकांना वाटायचं की या कार्यक्रमाचे उद्धाटन मोदींच्या हातून होऊ नये, पण नियतीसमोर कुणाचं काही चालत नाही."

मोदींच्या व्यक्तीमत्त्वामध्ये असं काही आहे की जे आपल्याला उर्जा देतं. येत्या दोन अडीच वर्षामध्ये या मुंबईचा कायापालट आपल्याला पाहायला मिळेल असं मुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले की, "2015 मध्ये नरेंद्र मोदी यांनी याच मेट्रोची सुरूवात केली होती. आज त्यांच्या हातातूनच मेट्रोचं उद्धाटन होतंय हा दैवी योग. मी पंतप्रधानांचे त्याबद्दल आभार मानतो. महाराष्ट्राचे लोक त्यामुळे भाग्यवान आहेत. येत्या दोन वर्षात मुंबईचा कायापालट करु."

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये नागपूर-मुंबई महामार्गाची सुरूवात केली, त्यामुळे समृद्धी मुंबईत दाखल झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांचं नातं वेगळं होतं, त्यांच्यात हिंदुत्व हा समान धागा होता, असं ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या काळात साडेतीनशे किमीच्या मेट्रोच्या जाळ्याची सुरूवात झाली. मधल्या काळात यावर काही काम झालं नाही. आता आमचं सरकार आल्यानंतर त्याला पुन्हा चालना मिळाली. दरवर्षी खड्ड्यात जाणारा मुंबईकरांचा पैसा आम्ही आता वाचवणार असून मुंबईतील चारशे किमीच्या रस्त्यांचं आता काँक्रिटीकरण होणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
सैफ अली खानवर चाकू हल्ला, गृहविभाग काम करतोय का? वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल
एखादी व्यक्ती घरात घुसते चाकू हल्ला करते, कायदा सुव्यवस्था कुठेय? वर्षा गायकवाडांचा सवाल
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रमDhananjay Deshmukh : धनंजय देशमुख अंतरवाली सराटीत, मनोज जरांगेंच्या भेटीचं कारण काय?Top 70 at 07 AM Superfast 7AM 16 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्याSupriya Sule Pankaja Munde : सुप्रिया-पंकजांची गळाभेट,सुनेत्रांची एन्ट्री,बारामतीत नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan : रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
रात्रीच्या 2 वाजता सैफ अली खानच्या घरात काय घडलं? जाणून घ्या इनसाइड स्टोरी
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
Saif Ali Khan Attack Full Story : सपासप वार, मानेला मोठी जखम; सैफवरील हल्ल्याचा पूर्ण घटनाक्रम
सैफ अली खानवर चाकू हल्ला, गृहविभाग काम करतोय का? वर्षा गायकवाड यांचा थेट सवाल
एखादी व्यक्ती घरात घुसते चाकू हल्ला करते, कायदा सुव्यवस्था कुठेय? वर्षा गायकवाडांचा सवाल
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
सैफ अली खानच्या मानेवर खोल जखम, धारदार पातं पाठीत रुतून राहिलं, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया
Saif Ali Khan Attacked in Mumbai: सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
सैफ अली खानवर मुंबईत चोराकडून धारदार शस्त्राने वार; सुप्रिया सुळेंनी पुण्यातून लगेच फोन फिरवला, म्हणाल्या....
PM Kisan : पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2000 कधी येणार?शेतकऱ्यांचं लक्ष लागलं
पीएम किसानचे आतापर्यंत 36000 रुपये मिळाले, 19 व्या हप्त्याचे 2 हजार कधी येणार,शेतकऱ्यांचं लक्ष लागलं
Nagpur News : महसूल विभागाकडून जात प्रमाणपत्र देण्यास विलंब! पारधी समाजावर मुलींचे लग्न बालवयात लावण्याची दुर्दैवी वेळ, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील धक्कादायक प्रकार
महसूल विभागाकडून जात प्रमाणपत्र देण्यास विलंब! पारधी समाजावर मुलींचे लग्न बालवयात लावण्याची दुर्दैवी वेळ, मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील धक्कादायक प्रकार
Walmik Karad: वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
वाल्मिक कराडला कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी कार घुसल्या अन्...
Embed widget