एक्स्प्लोर

BMC Budget : महापालिकेच्या ठेवी मोडल्या हा आरोप चुकीचा, आजही 82,800 कोटींची ठेव, मुंबईला लुटणाऱ्यांना आरसा दाखवला, एकनाथ शिंदेंचा टोला

BMC Budget 2025 : आज मुंबईत विकासकामांवर 43 हजार कोटी रुपये खर्च होतात. या आधी फक्त 25 टक्के रक्कम विकासांवर खर्च व्हायची असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

मुंबई : महापालिकेच्या ठेवी मोडल्या हा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. सध्या 82,800 कोटी रुपयांच्या ठेवी असूनही मुंबईतील विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. आधी विकासकामं होत नव्हती, आता विकासकामांमध्ये वाढ झाली आहे असंही ते म्हणाले. मुंबई महापालिकेच्या एफडी मोडल्या नसल्याचा दावाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी केला. 

मुंबई महापालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation BMC) ठेवी महायुतीकडून मोडल्या जात आहेत, त्यातील पैसे काढले जात आहेत असा आरोप सातत्याने ठाकरे गटाकडून केला जातोय. या आधी मुंबई महापालिकेच्या ठेवी या 91 हजार कोटींहून अधिक होत्या. आता त्या 82 हजार कोटींवर आल्या असून महायुती सरकारने या ठेवी मोडल्या असा आरोप केला जात आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आरोप करणाऱ्यांना आम्ही काम करुन उत्तर देतोय. त्यामुळेच मुंबईच्या तिजोरीत आज सात हजारांची भर पडली आहे. मुंबईत आज 43 हजार कोटींची विकासकामं केली जात आहेत. त्यामुळे एफडीबद्दलचे सगळे आरोप खोटे आहेत, ते वस्तुस्थितीला धरून नाहीत. 

Eknath Shinde On BMC Budget 2025 : आता विकासावर खर्च केला जातोय

एकनाथ शिंदे म्हणाले की,  "विकास करताना खर्च वाढला आहे. पूर्वी विकासावर खर्च केला जात नव्हता. आता विकासावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातोय. त्यामुळे ठेवी मोडल्या हा आरोप चुकीचा आहे. त्यासंबंधी आयुक्तांना विचारून घ्या. पूर्वी 25 टक्के रक्कम ही विकासकामांवर खर्च व्हायची. त्यामध्ये आता 58 टक्के रक्कम ही विकासकामांवर केली जातेय. त्यामुळेच पुढील दोन ते तीन वर्षांमध्ये मुंबई खड्डेमुक्त होणार आहेत."

Eknath Shinde On BMC FD :  आधीचे लोक मुंबईला लुटत होते

ठाकरे गटाने केलेल्या आरोपावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "आता मुंबई महापालिकेची एफडी 82,800 कोटी रुपये असूनही विकासकामांवर एवढा मोठा खर्च होतोय.  याचा अर्थ या आधी मुंबईला लुटणारे लोक होते, त्यांना आम्ही आरसा दाखवला आहे. जे मुबईला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजत होते त्यांना आता अडीच वर्षात कसा विकास होऊ शकतो हे आम्ही दाखवले असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना टोला लगावला. तसेच आरोप करण्यापेक्षा सकारात्मक बाजू तपासा असा सल्लाही त्यांना दिला."

Eknath Shinde On Mumbai Budget 2025 : पुढच्या दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त

एकनाथ शिंदे म्हणाले की, "विरोधकांना टिका आणि आरोपांशिवाय काही काम नाही. आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प झाला. त्यामध्ये कुठलीही करवाढ नाही, दरवाढ नाही. असा मुंबईच्या सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे. मुंबई वेगाने विकसित होत आहे. मी जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा मी आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई खड्डेमुक्त करण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या. त्यावेळी जवळपास 3 हजार कोटी आपण रिपेअरवर खर्च केलेत. आपले दोन्ही फेज सिंमेट काँक्रिटने करण्याचे सुरु आहे. पुढच्या दोन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त होणार."

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
Kalpana Chawla : सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
MPSC परीक्षा आता UPSC प्रमाणेच होणार, मुख्यमंत्र्‍यांची मोठी घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही
MPSC परीक्षा आता UPSC प्रमाणेच होणार, मुख्यमंत्र्‍यांची मोठी घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 March 2025ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 19 March 2025 दुपारी ३ च्या हेडलाईन्सRSS On Aurangzeb :औरंगजेबचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही, संघाने कान टोचले: Majha Special DiscussionNagpur Aurangzeb Solgan Video : हिंसेपूर्वी जमावाकडून काही धार्मिक घोषणाबाजीही झाल्याची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
लव्ह मॅरेज, मर्चंट नेव्हीत लंडनला नोकरी; बायकोच्या बर्थडेसाठी सौरभ भारतात आला; बायकोनं प्रियकराच्या मदतीनं 15 तुकडे करत ड्रममध्ये टाकले
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
वादळ नाही तर त्सुनामी, वनडे सामन्यात 770 धावा, 50 चौकार अन् 22 षटकारांची बरसात; एकानेच 404 धावांचा पाऊस पाडला, 732 धावांनी दणदणीत विजय
Kalpana Chawla : सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
सुनिता विल्यम्स यांची तब्बल नऊ महिन्यांनी मोहीम फत्ते, पण कल्पना चावला परतल्याच नाहीत; अवघ्या 16 मिनिटात काय घडलं होतं 22 वर्षांपूर्वी?
MPSC परीक्षा आता UPSC प्रमाणेच होणार, मुख्यमंत्र्‍यांची मोठी घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही
MPSC परीक्षा आता UPSC प्रमाणेच होणार, मुख्यमंत्र्‍यांची मोठी घोषणा; कुठलाही विरोध ग्राह्य धरणार नाही
औरंगजेब हा सध्या संयुक्तिक मुद्दा नाही; नागपूरच्या घटनेनंतर संघाचं मोठं वक्तव्य, काँग्रेसकडूनही भूमिकेचं स्वागत
औरंगजेब हा सध्या संयुक्तिक मुद्दा नाही; नागपूरच्या घटनेनंतर संघाचं मोठं वक्तव्य, काँग्रेसकडूनही भूमिकेचं स्वागत
Hardik Pandya : 'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?
'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' आयपीएलच्या तोंडावर हार्दिक पांड्या काय काय म्हणाला?
रेशनचा माल काळ्या बाजारात विकला, महसूल विभागाची कारवाई; 5 दुकाने सील, परवाना रद्द
रेशनचा माल काळ्या बाजारात विकला, महसूल विभागाची कारवाई; 5 दुकाने सील, परवाना रद्द
40 वर्षानंतर महिला गर्भवती होऊ शकते का? जाणून घ्या गरोदरपणाबाबत तुमच्या प्रश्नांची उत्तरे!
40 वर्षानंतर महिला गर्भवती होऊ शकते का? जाणून घ्या गरोदरपणाबाबत तुमच्या प्रश्नांची उत्तरे!
Embed widget