एक्स्प्लोर

एकनाथ खडसे आणि शरद पवार यांची मुंबईत भेट होण्याची चर्चा

एकनाथ खडसे मुंबईत दाखल झाले असून ते शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा सुरु आहे. उत्तर महाराष्ट्रातील एक बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं बातमी समोर आली होती. हा बडा नेता म्हणजे एकनाथ खडसेच असल्याची चर्चा रंगली होती.

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे मुंबईत दाखल झाले असून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. लवकरच मोठा निर्णय घेऊ असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आज एकनाथ खडसे आणि शरद पवार यांची भेट होणार का याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

उत्तर महाराष्ट्रातील एक बडा नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं बातमी समोर आली होती. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची चर्चाही झाल्याचं म्हटलं जात होता. हा बडा नेता म्हणजे एकनाथ खडसेच असल्याची चर्चा रंगली होती. त्यातच आज एकनाथ खडसे आणि शरद पवार यांची भेट होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जर ही भेट झालीच तर यानंतर काय होणार याची उत्सुकता आहे.

उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?

भाजपाला नुकसान पोहचेल असा निर्णय एकनाथ खडसे घेणार नाहीत : चंद्रकांत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाबाबतच्या चर्चांवर एकनाथ खडसे म्हणतात...

दरम्यान ही भेट कधी होणार याची वेळ निश्चित झाली नसली तरी ही भेट होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. शरद पवार आपल्या दैनंदिन कामकाजासाठी वाय बी चव्हाण सेंटरमध्ये पोहोचले आहेत. एकनाथ खडसे सध्या त्यांच्या चर्चगेट इथल्या निवासस्थानी आहेत. यासंदर्भात एकनाथ खडसे यांच्याकडे विचारणा केली असता, मी एकनाथ खडसे आहे, लपूनछपून कोणत्याही गोष्टी करत नाही असं बोलून प्रश्नाला बगल देण्याचा प्रयत्न केला. परंतु भेट होणार नाही, अशी शक्यताही नाकारली नाही.

शरद पवार यांच्या नेतृत्त्वात जळगावमधील स्थानिक नेत्यांची काही दिवसांपूर्वी बैठक झाली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. त्यात खडसेंच्या प्रवेशाबाबत निर्णय घेतला जाणार होता. परंतु राष्ट्रवादीने यासंदर्भात अद्याप कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. गाठीभेटींचा सिलसिला सुरु आहे. चर्चेचं गुऱ्हाळ सुरु आहे. त्यामुळे आज जर दोन्ही नेत्यांची भेट झाली तर त्यामध्ये काय निर्णय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील प्रकृती खालावल्याने दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल
मनोज जरांगे पाटील प्रकृती खालावल्याने दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल
Avinash Bhosale : मोठी बातमी! अविनाश भोसले यांना मोठा दिलासा, एक लाखांच्या जातमुचलक्यावर अखेर जामीन मंजूर
मोठी बातमी! अविनाश भोसले यांना मोठा दिलासा, एक लाखांच्या जातमुचलक्यावर अखेर जामीन मंजूर
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
Rakhi Sawant Health Updates : रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राखी सावंतने स्वत: दिली हेल्थ अपडेट, म्हणाली गर्भाशयात गाठ आता...
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राखी सावंतने स्वत: दिली हेल्थ अपडेट, म्हणाली गर्भाशयात गाठ आता...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Chanda Te Banda : चांदा ते बांदा बातम्यांचे अपडेट्स : 17 मे 2024 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 17 May 2024Chhagan Bhujbal Full PC: तुमच्याकडचे अनेक लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक, भुजबळांचा जयंत पाटलांना टोलाABP Majha Headlines : 02 PM : 17 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील प्रकृती खालावल्याने दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल
मनोज जरांगे पाटील प्रकृती खालावल्याने दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल
Avinash Bhosale : मोठी बातमी! अविनाश भोसले यांना मोठा दिलासा, एक लाखांच्या जातमुचलक्यावर अखेर जामीन मंजूर
मोठी बातमी! अविनाश भोसले यांना मोठा दिलासा, एक लाखांच्या जातमुचलक्यावर अखेर जामीन मंजूर
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
'महाजनांकडे लोण्याचं मडकं, नाराजांना लोणी लावण्याचंच त्याचं काम', भुजबळ-महाजन भेटीवर वडेट्टीवारांची सणसणीत टीका
Rakhi Sawant Health Updates : रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राखी सावंतने स्वत: दिली हेल्थ अपडेट, म्हणाली गर्भाशयात गाठ आता...
रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राखी सावंतने स्वत: दिली हेल्थ अपडेट, म्हणाली गर्भाशयात गाठ आता...
गडचिरोली पोलिसांनी असा रचला सापळा; 20 लाखांच्या देशी-विदेशी दारुसह दोघांना अटक
गडचिरोली पोलिसांनी असा रचला सापळा; 20 लाखांच्या देशी-विदेशी दारुसह दोघांना अटक
Prithviraj Chavan: भाजपला 250 जागा मिळतील, मोदींचा 'तो' सेल्फ गोल सत्ता निसटत चालल्याचं लक्षण: पृथ्वीराज चव्हाण
भाजपला 250 जागा मिळतील, मोदींचा 'तो' सेल्फ गोल सत्ता निसटत चालल्याचं लक्षण: पृथ्वीराज चव्हाण
HSC SSC Result : बारावीचा निकाल पुढील आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता, बोर्डाचं काम अंतिम टप्प्यात, दहावीचा निकाल कधी लागणार?
HSC SSC Result : दहावी बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार, निकालाचं काम अंतिम टप्प्यात, जाणून घ्या अपडेट
Bollywood Actress : 7 सुपरहिट चित्रपटानंतर अभिनेत्रीचा सिनेसृष्टीला रामराम; सुपरस्टारच्या भावाच्या प्रेमात वेडी झाली, मृत्यूचं गुढ आजही कायम
7 सुपरहिट चित्रपटानंतर अभिनेत्रीचा सिनेसृष्टीला रामराम; सुपरस्टारच्या भावाच्या प्रेमात वेडी झाली, मृत्यूचं गुढ आजही कायम
Embed widget