एक्स्प्लोर

अनिल देशमुखांवरील 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी ईडी पाच बार मालकांची चौकशी करणार

अनिल देशमुख यांच्यावरील कथित 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी मुंबईतील पाच बार मालकांची चौकशी होणार आहे. सचिन वाझेच्या दाव्यानुसार बार मालक त्यांना त्रास होऊ नये म्हणून दर महिन्याला अडीच लाख रुपये देत होते. त्यानुसार ईडीने पाच बार मालकांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांना समन्स बजावला आहे. 

मुंबई : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांप्रकरणी आता मुंबईतील पाच बार मालकांची चौकशी होणार आहे. अंमबजावणी संचालनालयाने या बार मालकांना समन्सही बजावला आहे. त्यामुळे या प्रकरणात ईडी अॅक्शन मोडमध्ये आल्याचं चित्र आहे.

अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि आणखी दोन पोलीस अधिकाऱ्यांना बार मालक आणि इतरांकडून 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री, राज्यपालांना पत्र लिहिलं होतं. यानंतर अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. शिवाय सीबीआय आता या प्रकरणाची चौकशी करत आहे.

बार मालक दर महिन्याला अडीच लाख रुपये देत होते असा आरोप बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेने केला होता. सेवेत असताना सचिन वाझे तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना रिपोर्ट करत होता. मार्चमध्ये सचिन वाझेला अटक केली होती.

यानंतर आता ईडी देखील प्रकरणाचा तपास करत आहे. ईडीने दोन आठवड्यांपूर्वी अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. सचिन वाझेच्या दाव्यानुसार हे बार मालक त्यांना त्रास होऊ नये म्हणून दर महिन्याला अडीच लाख रुपये देत होते. त्यानुसार ईडीने पाच बार मालकांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांना समन्स बजावला आहे. 

आर्थिक व्यवहाराच्या अँगलने ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. सचिन वाझे, अनिल देशमुख आणि त्यांच्याशी संबंधितांची चौकशी ईडी करणार आहे. तसंच परमबीर सिंह आणि त्यांच्या निकटवर्तींचे आर्थिक व्यवहार देखील ईडी तपासणार आहे. 

परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी आपण गृहमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

मागील आठवड्यात ईडीने अॅडव्होकेट जयश्री पाटील यांचा जबाब नोंदवला होता. जयश्री पाटील यांनीही अनिल देशमुख यांच्याविरोधात याचिका दाखल करणाऱ्यांपैकी एक होत्या. या याचिकेवर निकाल देताना हायकोर्टाने सीबीआय चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
Pradosh Vrat 2025 : एकवेळ उपाशी राहा, पण प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'ही' कामं; कोसळेल संकटांचा डोंगर
एकवेळ उपाशी राहा, पण प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'ही' कामं; कोसळेल संकटांचा डोंगर
Vijay Wadettiwar on ST Fair Hike : एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
Masik Shivratri 2025 : आज वर्षातील पहिल्या मासिक शिवरात्रीला करा 'हे' छोटे उपाय; क्षणात उघडेल निद्रीस्त भाग्य, सुख-संपत्तीत होईल अपार वाढ
आज वर्षातील पहिल्या मासिक शिवरात्रीला करा 'हे' छोटे उपाय; क्षणात उघडेल निद्रीस्त भाग्य, सुख-संपत्तीत होईल अपार वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vijay Wadettiwar : ... तर ST भाडेवाढ तात्काळ मागे घेत जनतेला दिलासा द्यावा९ सेकंदात बातमी Top 90 at 9AM Superfast 27 January 2025 सकाळी ९ च्या महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 27 January 2025Achyut Palav Padma Shri Award : सुविचार लिहिण्यापासून ते पद्मश्रीपर्यंतचा प्रवास; अच्युत पालव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
Pradosh Vrat 2025 : एकवेळ उपाशी राहा, पण प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'ही' कामं; कोसळेल संकटांचा डोंगर
एकवेळ उपाशी राहा, पण प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'ही' कामं; कोसळेल संकटांचा डोंगर
Vijay Wadettiwar on ST Fair Hike : एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
Masik Shivratri 2025 : आज वर्षातील पहिल्या मासिक शिवरात्रीला करा 'हे' छोटे उपाय; क्षणात उघडेल निद्रीस्त भाग्य, सुख-संपत्तीत होईल अपार वाढ
आज वर्षातील पहिल्या मासिक शिवरात्रीला करा 'हे' छोटे उपाय; क्षणात उघडेल निद्रीस्त भाग्य, सुख-संपत्तीत होईल अपार वाढ
Orange Growers Compensation : सततच्या पावसाने नुकसान झालेल्या विदर्भातील संत्रा उत्पादकांना तब्बल 165 कोटींची नुकसान भरपाई जाहीर; मात्र, नागपूरला दीड दमडी सुद्धा नाही!
सततच्या पावसाने नुकसान झालेल्या विदर्भातील संत्रा उत्पादकांना तब्बल 165 कोटींची नुकसान भरपाई जाहीर; मात्र, नागपूरला दीड दमडी सुद्धा नाही!
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतानंतर आता बांगलादेशवर सर्जिकल स्ट्राईक! एका झटक्यात अंतरिम सरकारच्या नाड्या आवळल्या
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतानंतर आता बांगलादेशवर सर्जिकल स्ट्राईक! एका झटक्यात अंतरिम सरकारच्या नाड्या आवळल्या
Ajit Pawar & Sharad Pawar: शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजितदादांचा फोन, राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण
शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी अजितदादांचा फोन, राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण
Delhi Election : चला, महाठग अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'वर फेरफटका मारुया! भाजपकडून थेट तीन मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल
Video : चला, महाठग अरविंद केजरीवालांच्या 'शीशमहल'वर फेरफटका मारुया! भाजपकडून थेट तीन मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल
Embed widget