एक्स्प्लोर
Advertisement
वादग्रस्त धर्मप्रचारक झाकीर नाईकविरोधात गुन्हा
मुंबई : वादग्रस्त इस्लामिक धर्मप्रचारक झाकीर नाईकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी अंमलबजावणी संचलनालयाने झाकीर नाईक आणि त्याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
'झाकीर नाईक इस्लामला बदनाम करतो आहे'
ईडीच्या सुत्रांच्या माहितीनुसार, झाकीर नाईक आणि आयआरएफविरोधारत पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे. ही रक्कम कोट्यवधींची असल्याचं कळतं. झाकीर नाईक आणि आयआरएफच्या विविध बँक खात्यांची आणि देणगींचीही चौकशी होणार आहे.
मी शांतीदूत, मात्र युद्धात आत्मघाती हल्ले योग्य : झाकीर नाईक
बांगलादेशातील हल्लेखोर झाकीर नाईकच्या भाषणाने प्रभावित काही महिन्यांपूर्वी बांगलादेशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी हा झाकीर नाईकच्या भाषणांनी प्रभावित होता. त्यामुळे बांगलादेशात झाकीर नाईकच्या पीस टीव्हीवर बंदी घालण्यात आली. याशिवाय भारतातही हे चॅनेल बंद करण्यात आलं आहे. तरुणांची माथी भडकावून, अशांतता निर्माण करत असल्याचा आरोप झाकीरवर आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement