एक्स्प्लोर
Advertisement
ई-कॉमर्स क्षेत्रात 1 लाख 20 हजार तरुणांना रोजगाराची संधी
ई-कॉमर्स क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अशा प्रकारच्या नोकऱ्यात 30 ते 35 टक्क्यांची वाढ झाली आहे.
मुंबई : अमेझॉनचा द ग्रेट इंडियन सेल, फ्लिपकार्टचा बिग दिवाळी सेल, अमुक कंपनीचा तमुक सेल... दसरा-दिवाळीच्या तोंडावर ग्राहकांनी उड्या मारल्या. पण यात आणखी एक मोठी उलाढाल झाली आहे. ती बंपर नोकऱ्यांची. देशातल्या विविध ई-कॉमर्स कंपन्यांनी यंदा 1 लाख 20 हजार तरुणांना तात्पुरत्या स्वरुपाच्या नोकऱ्या दिल्याची माहिती आहे.
किती पगार मिळणार?
डिलिव्हरी बॉयला प्रत्येकी 14 ते 18 हजारपर्यंत प्रतिमहिना पगार दिला जाईल
नोकरी कशी मिळवाल?
कन्सल्टंटच्या माध्यमातून किंवा सरळ ऑनलाइन बायोडेटा मेल करुन नोकरी मिळू शकेल
काय काम करावं लागणार?
मुख्यत्वे प्रॉडक्ट डिलीव्हरी करणे, पॅकिंग आणि लॉजिस्टिकची कामं
किती तास काम करावं लागणार?
दिवाळीच्या दिवसात जवळपास 10 ते 12 तास काम करावं लागणार
काम करायचं तर फक्त दोन तीन महिनेच का? त्यानंतर काय ? दिवाळीच्या दिवसात हे काम कितपत अवघड असेल, असे प्रश्न तुम्हाला पडले असतील. तर यानंतरही तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी अनुभवावरुन संधी मिळणार आहेत. त्यामुळे घरी बसण्यापेक्षा जर दिवाळीत चार पैसे येत असतील, तर चांगलंच आहे, हा विचार करणाऱ्यांसाठी या नोकऱ्या लाभदायक ठरतील.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अशा प्रकारच्या नोकऱ्यात 30 ते 35 टक्क्यांची वाढ झाली आहे. भविष्यात ज्या प्रकारे ई-कॉमर्सच्या माध्यमातून मोठ्या संख्येने खरेदी केली जात आहे, त्या तुलनेत नोकरीच्या संधी दिवसेंदिवस वाढत जात आहेत. त्यामुळे सध्या नोकऱ्या तात्पुरत्या असल्या, तरी भविष्यात या क्षेत्रात मोठ्या संधीचे संकेत मिळत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
मुंबई
Advertisement