(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mahaparinirvan Din : महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष लोकल चालणार, जाणून घ्या वेळापत्रक
Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Special Local : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर येण्यासाठी 8 विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत
Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Special Local : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादन करता येणार आहे. कोरोनासंबंधित नियमांचं पालन करुन चैत्यभूमीवर येण्याची परवानगी देण्यात आली आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -पनवेल स्थानकांदरम्यान मध्य रेल्वे प्रवाशांकरीता 8 उपनगरीय विशेष गाड्या (Mumbai Local) चालवण्यात येणार आहेत. या उपनगरीय विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील.
विशेष लोकलचं वेळापत्रक असं असेल
मेन लाईन - अप विशेष:
• कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - विशेष कल्याण येथून 1 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 2.30 वाजता पोहोचेल.
• कल्याण- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष कल्याण येथून 2.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 3.45 वाजता पोहोचेल.
मेन लाईन - डाउन विशेष:
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 1.30 वाजता सुटेल आणि कल्याण येथे 3.00 वाजता पोहोचेल.
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कल्याण विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 2.30 वाजता सुटेल आणि कल्याण येथे 4 वाजता पोहोचेल.
हार्बर लाइन - अप विशेष:
• पनवेल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून 1.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 2.30 वाजता पोहोचेल.
• पनवेल- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष पनवेल येथून 2.30 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 3.50 वाजता पोहोचेल.
हार्बर लाइन - डाउन विशेष:
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 1.40 वाजता सुटेल आणि पनवेल येथे 3.00 वाजता पोहोचेल.
• छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - पनवेल विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 2.40 वाजता सुटेल आणि पनवेल येथे 4.00 वाजता पोहोचेल.
प्रवाशांनी ट्रेनमध्ये चढताना, प्रवास करताना आणि उतरताना कोविड-19 नियमांचे पालन करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलं आहे. तसेच गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी योग्य तिकीट काढून प्रवास करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.