एक्स्प्लोर

Mumbai Crime : दाऊदचा हस्तक रियाझ भाटीला 1 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी 

Mumbai Crime News : डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) टोळीचा सदस्य आणि त्याच्या जवळचा समजला जाणारा रियाझ भाटी (Riyaz Bhati) याला न्यायालयाने 1 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Mumbai Crime News : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) टोळीचा सदस्य आणि त्याच्या जवळचा समजला जाणारा रियाझ भाटी (Riyaz Bhati) याला न्यायालयाने 1 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मुंबई गुन्हे शाखेने AEC (Anti Extortion Cell) काल अंधेरी येथून त्याला अटक केली होती. रियाझ भाटी आणि छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूट यांनी एका व्यावसायिकाकडून  62 लाख रूपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सलीम याला  यापूर्वीच अटक करण्यात आली असून रियाझ याला काल अटक करण्यात आली. खंडणीची रक्कम दिली नाही तर व्यवसायिकाला जीवे मारण्याची धकमी या दोघांनी दिली होती. याबाबत संबंधित व्यावसायिकाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात या दोघांनी व्यवसायिकाला धमकी दिली होती. 

रियाझ भाटी याला अटक केल्यानंतर मुंबईतील किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. पोलिसांनी त्याची 14 दिवस कोठडी मिळावी अशी मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला 1 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

मुंबईतील वर्सोवा पोलिस ठाण्यात भाटी याच्याविरोधात एका व्यावसायिकाने खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली आहे. जीवे मारण्याची धमकी दिल्याने संबंधित व्यावसायिकाने संशयितांच्या खात्यात 7 लाख 50 हजार रूपये ट्रान्फर केले होते. एवढेच नाही तर त्याने आपल्या पत्नीच्या नावावर असणारी महागडी कार देखील आरोपींना दिली होती. या कारची किंमत तब्बल 30 लाख रूपये होती. तक्रारदार हे मुंबईतील वर्सोवा भागातील आहेत. खंडणीबाबात पोलिसांमध्ये तक्रार दिली किंवा कोणाला माहिती दिली तर ठार मारण्यात येईल अशी धमकी तक्रारदारांना देली होती. संबंधित व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी 387, 506 (2), 120 (B) आणि 34 अंतर्गत सलीम फ्रूट आणि रियाझ भाटी यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि प्रकरणाचे गाांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे देण्यात आला. 

गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एनआयएच्या कोर्टात सलीम फ्रूट याची कोठडी मागण्यासाठी अर्ज केला आहे. शिवाय आज पोलिस रियाझ भाटीला न्यायालयात हजर करून त्याच्या कोठडीची मागणी करणार आहेत. गँगस्टर छोटा शकील याचा साडू सलीम इक्बाल कुरेशी उर्फ सलीम फ्रूट याला यापूर्वीच अटक केली आहे.   
 
कोण आहे रियाझ भाटी? 

रियाझ भाटी हा गँगस्टर दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय आहे. त्याच्यावर खंडणी, जमीन बळकावणं, फसवणूक आणि गोळीबार अशा अनेक प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. 2015 आणि 2020 मध्ये न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन करून बनावट पासपोर्टचा वापर करून देशातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला अटक करण्यात आली होती. जुलै 2021 मध्ये गोरेगाव येथे नोंदवलेल्या एफआयआरमध्ये मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह आणि सहाय्यक निरीक्षक सचिन वाझे यांच्यासह भाटी यांचेही आरोपी म्हणून नाव होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाटी हा वाझेच्या वतीने बार आणि रेस्टॉरंटमधून पैसे गोळा करत होता असा संशय आहे. 

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Navy Nagar Family Death: मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
मुंबईतील नेव्ही ऑफिसरने पत्नी आणि दोन मुलांसह स्वत:लाही संपवलं; आता पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हादरवणारी माहिती, सगळ्यात मोठा ट्विस्ट, नेमकं काय समोर आलं?
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget