एक्स्प्लोर

डोंबिवली स्फोट : कंपनीच्या मालकाच्या घरावर दु:खाचा डोंगर, कुटुंबातील तिघांचा मृत्यू

मुंबई : डोंबिवलीच्या एमआयडीसीतील स्फोटात कंपनीचे मालक विश्वास वाकटकर यांनी सर्वस्व गमावलं आहे. वाकटकर कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. विश्वास वाकटकर यांचा मुलगा आणि कंपनीचा संचालक नंदन वाकटकर, दुसरा मुलगा सुमीत वाकटकर आणि सुमीत यांची पत्नी स्नेहल वाकटकर यांचा मृत्यू झाला आहे. तर विश्वास वाकटकर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत   नंदन वाकटकर हे कंपनीच्या संचालक पदावर कार्यरत होते, तर सुमित वाकटकर मॅनेजर पदाची जबाबदारी सांभाळत होती.   प्रोबेस कंपनीमधील स्फोटातील मृतांची संख्या शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 10 वर जाऊन पोहोचली. या प्रकरणी कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   डोंबिवलीतल्या स्फोटाला जबाबदार कोण? प्रोबेस केमिकल कंपनीचे मालक की सरकार? की प्रशासनाचं चुकीचं धोरण? प्रोबेस कंपनीत हलगर्जीपणा झाला का? याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम सुरु झालं आहे खरं, मात्र पण या स्फोटात कंपनीच्या मालकाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे.   विश्वास वाकटकर कोण?   विश्वास वाकटकर हे मुंबईचे माजी पोलिस उपायुक्त विनायक वाकटकर यांचे पुत्र आहेत. मुंबईतला सर्वात मोठा सिरियल किलर रामन राघवला बेड्या ठोकणारे अधिकारी अशी विनायक वाकटकरांची ओळख होती. पण वडील पोलीस असले तरी विश्वास वाकटकरांनी उद्योगाला महत्त्व दिलं. त्यांनीच 1984 साली ब्रोमेट कंपनीची सुरुवात केली.   वाकटकर कुटुंब मूळचं दादरचं!   पण डोंबिवलीत उद्योग करणारं हे कुटुंब मूळचं दादरचं आहे. खरं तर कुटुंबाचा व्यवसाय ज्वेलरीचा. पण विश्वास वाकटकरांनी आपली वेगळी वाट पकडली आणि प्रोबेस कंपनीची सुरुवात केली. प्रोबेस कंपनीत प्रोपार्जिल क्लोराईड तयार केलं जायचं. शिवाय प्रोपार्जिल ब्रोमाईडसारखे केमिकल्सचंही उत्पादन होत असे. ही दोन्ही केमिकल्स बहुतांश निर्यात केली जायची.   मुलगा नंदन कंपनीचा संचालक होता. दुसरा मुलगा सुमीत ऑपरेशन मॅनेजर म्हणून कंपनीत काम बघायचा. सुमीतची पत्नी स्नेहलदेखील कंपनीत महत्त्वाची जबाबदारी सांभाळत होती.   जेव्हा कंपनीत स्फोट झाला तेव्हा स्वतः विश्वास, मुलगा नंदन, सुमित आणि त्याची पत्नी स्नेहल हे कंपनीत होते. पण एका क्षणात हे कुटुंब उद्ध्वस्त झालं.     स्फोटाची खरी तीव्रता   डोंबिवलीत झालेल्या बॉयलरच्या स्फोटाची तीव्रता किती भीषण होती, हे आज सकाळी खऱ्याअर्थानं समोर आलं. कारण ज्या ठिकाणी स्फोट झाला, तिथे सुमारे 10 फूट खोल आणि किमान 40 फूट रुंद खड्डा पडला आहे.   काल दुपारपासून सुरु असलेल्या बचावकार्यामध्ये ढिगारा हटवण्यात आला. आणि त्यानंतर स्फोटाचं रौद्र रुप समोर आलं आहे. इतकंच नाही तर ब्रोमेस कंपनीला खेटून उभ्या असलेल्या इमारतींचीही काय अवस्था झाली आहे. हेही आता समोर आलं आहे.   भीषण स्फोट सीसीटीव्हीत कैद   ज्या स्फोटानं काल संपूर्ण डोंबिवली हादरली, त्या स्फोटाची भीषणता परिसरातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं कैद केली. ते सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलं.   डोंबिवली एमआयडीसीतल्या प्रोबेस कंपनीत झालेला बॉयलरचा स्फोट एवढा भीषण होता की फक्त आवाजानंच आजूबाजूच्या दुकानाच्या काचा फुटल्या. स्फोटाचा आवाज होताच लोक घराबाहेर पडण्यासाठी कशी धावपळ करतायत, याची दृश्यही सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.   प्रोबेस कंपनीपासून साधारण किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या दुकानातली ही दृश्य आहेत. बऱ्याच ठिकाणी काचाच नाही तर काही दुकानांचं अक्षरशः सिलिंग देखील कोसळलं आहे.   भीषण स्फोटाने डोंबिवली हादरली   डोंबिवली एमआयडीसीत गुरुवारी सकाळी पावणेबाराच्या सुमारास झालेल्या स्फोटात मृतांचा आकडा सातवर पोहचला आहे. तर १४० जण जखमी झाले आहेत. डोंबवली एमआयडीसीतल्या प्रोबेस एन्टरप्रायजेस या केमिकल बनवणाऱ्या कंपनीत बॉयलरचा स्फोट झाला.   स्फोट इतका भीषण होता की ५ किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरुन गेला. परिसरातल्या इमारतींच्या, गाड्यांच्या काचा फुटल्या. टपऱ्यांवरील पत्रे उडाले, तर शेजारील इतर केमिकल कंपन्याही उद्ध्वस्त झाल्या.   प्रोबसेच्या शेजारीही केमिकल कंपन्या असल्याने आग पसरत गेली. त्यामुळे लागलीच हा परिसर रिकामा करण्यात आला. तसंच इथला वीजपुरवठाही खंडीत करण्यात आला.   या स्फोटानं प्रोबेस एन्टरप्रायजेसची 3 मजली इमारत कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखालीही अनेक कर्मचारी दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बॉयलरमधल्या स्फोटामागचं नेमकं कारणं अद्याप समोर आलेलं नाही.   स्फोटातल्या जखमींवर डोंबिवलीतल्या विविध खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pawan Kalyan Solapur Road Show : पवन कल्याण यांचा सोलापुरात भव्य रोड शो; नागरिकांची तोबा गर्दीSpecial Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget