एक्स्प्लोर
Advertisement
अभ्यासाच्या ताणामुळे डॉक्टर तरुणीची आत्महत्या
अभ्यासाच्या तणावामुळे ठाण्यातील डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली आहे. ठाण्यातील कोलशेत येथील एव्हरेस्ट सोसायटीमध्ये राहणाऱ्या शर्मिष्ठा सोम (27) या तरुणीने इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली.
ठाणे : अभ्यासाच्या तणावामुळे ठाण्यातील डॉक्टर तरुणीने आत्महत्या केली आहे. ठाण्यातील कोलशेत येथील एव्हरेस्ट सोसायटीमध्ये राहणाऱ्या शर्मिष्ठा सोम (27) या तरुणीने इमारतीच्या 12 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. शर्मिष्ठा ही एमबीबीएस डॉक्टर होती. एमबीबीएसनंतर ती एम. डी. होण्यासाठी नीट परिक्षेची तयारी करत होती.
शर्मिष्ठा ही ठाण्यातील प्रसिद्ध डॉक्टर कावेरी सोम यांची मुलगी आहे. अभ्यास आणि मानसिक तणावामुळे तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. घटनेची माहिती मिळताच कापुरबावडी पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी शर्मिष्ठाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
शर्मिष्ठाचा नीट परीक्षेचा अभ्यास झाला नव्हता. याबाबत तिने आत्महत्येआधी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. रात्री जेवण झाल्यावर शर्मिष्ठाचे आई वडील झोपले. त्यानंतर पहाटे 5 वाजेपर्यंत ती अभ्यास करत होती. एमबीबीएस असलेल्या शर्मिष्ठाला एम. डी. व्हायचे होते. त्यासाठी तिचा अभ्यास सुरु होता. परंतु चांगला अभ्यास होत नसल्यामुळे ती तणावात होती.
शुक्रवारी शर्मिष्ठा आणि तिच्या आई-वडिलांमध्ये तिच्या अभ्यासावरुन चर्चादेखील झाली. परंतु तिचा मनासारखा अभ्यास होत नव्हता. त्यामुळे आपले एम. डी. होण्याचे स्वप्न अपूर्ण राहणार असे शर्मिष्ठाला वाटत होते. त्यामुळेच शर्मिष्ठाने इतके कठोर पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
Advertisement