एक्स्प्लोर

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये बदल

कोरोनाकाळात मास्क घालणं आणि सॅनिटायझर वापरणं या दोन्ही सवयी आता अंगवळणी पडल्या आहेत. पण, दिवाळीत फटाके फोडतांना यापैकी वारंवार सॅनिटायझरनं हात साफ करणं ही सवय मात्र महागात पडू शकते.

मुंबई : दिवाळी जवळ आली की, दरवर्षीच फटाक्यांच्या दु्ष्परिणामांची चर्चा होते. फटाक्यांमुळे दरवर्षीच होणारं ध्वनी आणि वायुप्रदुषण चिंतेचा विषय असतोच. मात्र, यंदाच्या दिवाळीतले फटाके हीच चिंता जरा जास्त वाढवू शकतात. एकीकडे, फटाक्यांमुळे होणारं वायु प्रदुषण कोरोना पेशंटसाठी घातक आहेच.मात्र, फटाके फोडतांना हाताला सॅनिटायझर लावायची सवयही आता महागात पडु शकते. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाचं दिवाळी सेलिब्रेशन बदललं आहे. कोरोनाकाळात मास्क घालणं आणि सॅनिटायझर वापरणं या दोन्ही सवयी आता अंगवळणी पडल्या आहेत. पण, दिवाळीत फटाके फोडतांना यापैकी वारंवार सॅनिटायझरनं हात साफ करणं ही सवय मात्र महागात पडू शकते.

यंदाच्या दिवाळीत काळजी न घेताच फटाके उडवलेत तर दिवाळीत आणि दिवाळीनंतर दुर्घटनांची माळही तडतडायला लागेल. म्हणूनच मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलानं मुंबईकरांना फटाके फोडण्याबाबत काही विशेष सूचना केल्या आहेत.

यंदाची दिवाळी साजरी करतांना काय काळजी घ्याल?

  • दिवाळी साजरी करताना मोठ्या आवाजाचे, मोठ्या आकाराचे, आकाशात उडणारे फटाके फोडू नका.
  • सोबतच फटाके फोडताना सॅनिटायझर जवळ बाळगू नका.
  • हाताला सॅनिटायझर लावू नका. अन्यथा आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
  • सॅनिटायझरऐवजी साबणानं वारंवार हात स्वच्छ धुवा.
  • जिथे फटाके ठेवले असतील त्याजवळ सॅनिटायझरची बाटली किंवा कॅन ठेऊ नका.
  • फटाके फोडतांना सुती आणि घट्ट कपडे घाला.
  • फटाके फोडल्यानंतर अंघोळ करा.

सॅनिटायझरमधील ज्वलनशील गुणधर्म हे फटाके फोडतांना घातक ठरु शकतात. सॅनिटायझरच्या मदतीनं आग लगेच फैलावू शकते. त्यामुळे, फटाके फोडतांना आकाशात उंच जाऊन फुटणारे फटाके टाळावेत आणि सॅनिटायझर ऐवजी साबणानं हात धुवावे असं आवाहन केलं जातंय.

गेल्या वर्षीच्या दिवाळीच्या दोन दिवसांत मुंबईत 127 आगीच्या घटना घडल्या आहेत. तर 2018 मध्ये दिवाळीच्या दोन दिवसांत मुंबईत 209 आगीच्या घटना घडल्या आहे. मुंबईत वर्षाला सरासरी 18,ooo ठिकाणी आगी लागतात. तर, दर महिन्याला सरासरी आगीच्या 1500 घटनांची नोंद होते. मात्र, असं असलं तरी मुंबईकरांना फटाक्यांबाबत पुरेसं गांभीर्य दिसत नाही. फटाक्यांच्या दुकानांजवळची वाढणारी गर्दी दिवाळी जवळ आली हे सांगते पण, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता हीच गर्दी चिंताही वाढवत आहे.

अनेक राज्यांमध्ये दिवाळीत फटाकेबंदीची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रात ठाकरे सरकारनं फटाकेबंदी केली नसली तरी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा असं आवाहन केलंय. कोरोना आणि लॉकडाऊनला कंटाळलेल्या अनेकांना यंदाची दिवाळीतरी धुमधडाक्यात साजरी करावी असं वाटतंय. पण, प्रकाशाच्या या उत्सवात नव्या संकटांची नांदी नको इतकंच...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget