एक्स्प्लोर

Mumbai Local Train Accident: मुंब्रा लोकल ट्रेन अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी डोंबिवली स्थानकात भयावह दृश्य, एसी लोकलच्या दरवाजाला प्रवाशी लटकले

Mumbai Local Train Accident: डोंबिवली स्थानकात प्रचंड गर्दी होते. सकाळच्या वेळेत प्रवाशांना डोंबिवलीत ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रचंड कष्ट करावे लागतात.

Mumbai Railway Accident: मध्य रेल्वेमार्गावरील मुंब्रा स्थानकाजवळ सोमवारी 13 प्रवासी चालत्या लोकल ट्रेनमधून खाली पडल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर नऊजण जखमी झाले होते. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर मुंबईकरांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता. मध्य रेल्वेच्या उशीरा धावणाऱ्या लोकल ट्रेन (Mumbai Local Train) आणि कोलमडलेल्या नियोजनामुळे वारंवार निर्माण होणाऱ्या समस्यांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. मात्र, या दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी डोंबिवली रेल्वे स्थानकात (Diva Railway Station) भयंकर दृश्य दिसून आले. डोंबिवली स्थानकात एसी लोकल ट्रेनमध्ये  (AC Local Train) चढण्यासाठी मंगळवारी प्रचंड गर्दी झाली होती. ही गर्दी इतकी होती की, प्रवासी लोकल ट्रेनप्रमाणे एसी ट्रेनच्या दरवाजात लटकले होते. त्यामुळे एसी लोकलचे दरवाजे बंद होत नव्हते. या सगळ्या गोंधळामुळे एसी लोकल बराचवेळ डोंबिवली स्थानकात थांबून होती. दारात लटकलेले प्रवासी काही केल्या खाली उतरायला तयार नव्हते. या सगळ्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल गाड्यांच्या अपुऱ्या संख्येचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दिवा, डोंबिवली, कळवा या रेल्वे स्थानकांमध्ये कर्जत आणि कल्याणहून येणाऱ्या अप मार्गावरील लोकल ट्रेन भरुन येतात. त्यामुळे दिवा स्थानकातील प्रवाशांना ट्रेनमध्ये जागा नसते. मात्र, सकाळच्या वेळेत कार्यालय गाठणे गरजेचे असल्याने दिवा स्थानकातील प्रवासी लोकल ट्रेनच्या फुटबोर्डवर जागा मिळाली तरी ट्रेनमध्ये चढतात. त्यामुळे दिवा स्थानकात ट्रेनला प्रचंड गर्दी होते. यामुळे अनेकदा अपघात होता. सोमवारी झालेला अपघात हे त्याचे ताजे उदाहरण. मात्र, त्यानंतरही मध्य रेल्वे प्रशासनाला जाग आलेली दिसत नाही. कारण मंगळवारी एसी लोकल ट्रेनमधील गर्दी आवरण्यासाठी स्थानकात रेल्वे पोलीस किंवा मध्य रेल्वेचे कर्मचारी यापैकी कोणीही उपस्थित नव्हते. 

Harbour Railway: हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक मंगळवारी सकाळी विस्कळीत झाली. नेरुळ स्थानकात ओव्हरहेड वायर तुटल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तब्बल दोन तासांनी रेल्वेकडून हा बिघाड दुरुस्त करण्यात आला. मात्र, दरम्यानच्या काळात लोकल ट्रेनचे वेळापत्रक कोलमडल्याने कामावर निघालेल्या कर्मचाऱ्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. अजूनही हार्बर मार्गावरील लोकल ट्रेन 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत.

आणखी वाचा

मुंब्रा लोकल ट्रेन अपघाताबाबत वेगळाच संशय, गाडीतून पडलेला प्रवासी नेमकं काय म्हणाला?

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Mumbai Voter List News: मुंबईत मतदार यादीत तब्बल 4 लाख 78 हजार 308 'मृत' मतदार; किरीट सोमय्यांनी उघड केली धक्कादायक आकडेवारी
मुंबईत मतदार यादीत तब्बल 4 लाख 78 हजार 308 'मृत' मतदार; किरीट सोमय्यांनी उघड केली धक्कादायक आकडेवारी
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
CAG Report: रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव
रेल्वे कारभारावर CAGचा गंभीर ठपका! 19, 458 कोटींचा अनधिकृत खर्च, 20 हजारांहून अधिक सुरक्षा कामे रखडली; तर 89 % स्थानकांवर मूलभूत सुविधांचा अभाव

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Embed widget