एक्स्प्लोर

Mumbai Local Train Accident: मुंब्रा लोकल ट्रेन अपघाताबाबत वेगळाच संशय, गाडीतून पडलेला प्रवासी नेमकं काय म्हणाला?

Mumbra train Accident news: मुंब्रा स्थानकाजवळ प्रवासी ट्रेनमधून खाली पडले. त्यांना नेमका कसला धक्का लागला, हे अद्याप कळालेले नाही. मध्य रेल्वेच्या टीमकडून घटनास्थळाची तपासणी

Mumbra Local Train Accident: मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकाजवळ सोमवारी 13 प्रवासी चालत्या लोकल ट्रेनमधून खाली पडले. यामध्ये चार प्रवाशांचा मृत्यू झाला. तर उर्वरित प्रवाशी जखमी झाले आहेत. मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन फास्ट मार्गावरुन दोन लोकल ट्रेन (Local Train) परस्परविरुद्ध दिशेला जात असताना हा अपघात घडला.  या दोन्ही ट्रेन आजुबाजूच्या ट्रॅकवरुन जात होत्या तेव्हा दारात उभ्या असलेल्या प्रवाशांच्या बॅगचा धक्का लागून 13 जण खाली पडल्याचे कारण मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले होते. मात्र, आता या अपघातप्रकरणात एक नवीन पैलू समोर आला आहे. मुंब्रा येथील हा लोकल ट्रेनचा अपघात लोखंडी रॉडमुळे झाला असावा, असा संशय मध्य रेल्वेला आहे. (Raiway Accident in Mumbai)

प्राथमिक माहितीनुसार, ज्या लोकल ट्रेनमधून प्रवासी खाली पडले त्या ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर ओरखडे आढळून आले आहेत. तसेच ट्रेनमधून पडलेल्या एका प्रवाशाने, 'आम्हाला काहीतरी लागल्यासारखं वाटले, असे सांगितले. आम्ही खाली पडण्यापूर्वी आम्हाला भिंतीला धडकल्यासारखं वाटलं', असे त्याने म्हटले. त्यामुळे ही 'अज्ञात' गोष्ट म्हणजे लोखंडी रॉड असावा, असा संशय मध्य रेल्वेला आहे. त्यादृष्टीने मध्य रेल्वेकडून दुर्घटनेचा तपास केला जात आहे. तर दुसऱ्या थिअरीनुसार अपघाताच्या वेळी दोन्ही लोकल ट्रेनमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रवासी होती. हे प्रवासी फुटबोर्डवर उभे होते. त्यांचा एकमेकांना धक्का लागून ते खाली पडल्याचे सांगितले जात आहे. यासाठी मध्य रेल्वेच्या पथकाने काल अपघातानंतर घटनास्थळाची पाहणी केली. यानंतर दोन्ही रेल्वे ट्रॅकमधील अंतर मोजण्यात आले. त्यामुळे आता या प्राथमिक चौकशीतून कोणती माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

मुंब्रा रेल्वे स्थानकातील अपघातानंतर प्लॅटफॉर्म नंबर 4 वर  आर पी एफ,जी आर पी एफ आणि लोकल पोलीस तैनात आहेत. काल दोन ट्रक मधील अंतर रेल्वे इंजिनियर्सकडून मोजण्यात आला. सध्या प्लॅटफॉर्म नंबर तीन आणि चार अप डाऊन मार्गाने ये जा करणाऱ्या लोकल आणि मेल एक्सप्रेस गाड्या वळणावरून धिम्या गतीने पुढे मार्गस्थ होत आहेत.

Central Railway: भाजप नेते किरीट सोमय्या मध्य रेल्वेला जाब विचारणार

मुंब्रा लोकल ट्रेन अपघातानंतर भाजपचे किरीट सोमय्या मध्य रेल्वेला जाब विचारणार आहेत. मुंब्र्यात काय झालं?कसं झालं?कोण जबाबदार असे सवाल ते मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांना विचारणार आहेत. मुंब्रा दुर्घटनेचा तपास होणं आणि जबाबदारी निश्चित करणं गरजेचे आहे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले. तर दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज मध्य रेल्वेच्या विरोधात धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. ठाण्यातील गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे स्थानक सकाळी नऊ वाजता मोर्चाची सुरुवात होईल. मनसे नेते अविनाश जाधव सह ठाणेकर रेल्वे प्रवासी देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.

आणखी वाचा

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवांनी मुंबई लोकल ट्रेन अपघातावर प्रतिक्रिया देण्याचीही तसदी घेतली नाही, एका वाक्यात विषय संपवला

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
ST Students School Admission: राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
राज्यातील 25 हजार आदिवासी विद्यार्थ्यांना सरकारच्या दिरंगाईचा फटका, शाळा सुरु होऊन दोन महिने उलटले तरीही प्रवेशच नाही
Amit Thackeray on ABVP: मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
मुलींचा हात धरल्यावर आम्ही तुम्हाला मारणारच! अमित ठाकरेंचा 'अभाविप'ला इशारा, साठ्ये महाविद्यालयातील राड्याबाबत काय म्हणाले?
Cab Driver Viral Video: मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'
मुंबईतील मराठी तरुणाचा अमराठी कॅब चालकासोबत वाद, ओटीपी मराठीत सांगताच ड्रायव्हर भडकला, म्हणाला, 'अ‍ॅप इंग्रजी, मग....'

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Embed widget