एक्स्प्लोर

भाजप आमदार अनिल गोटेंची नरमाई, 'या' दोन अटींवर राजीनामा मागे

गुन्हेगारांना पक्षात प्रवेश देणार नाही आणि धुळे महापालिकेच्या निवडणुका गोटेंच्याच नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातील, या अटी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या.

मुंबई : धुळ्यातील भाजपचे नाराज आमदार अनिल गोटे यांनी आपला राजीनामा देण्याचा निर्णय तूर्तास मागे घेतला आहे. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर दोन अटींवर राजीनामा मागे घेतल्याची कबुली गोटेंनी विधानभवन परिसरात दिली. मुख्यमंत्र्यांनी साडेतीन तास चर्चा करुन मन वळवल्याचं आमदार अनिल गोटे यांनी सांगितलं. गुन्हेगारांना पक्षात प्रवेश देणार नाही आणि धुळे महापालिकेच्या निवडणुका गोटेंच्याच नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातील, या अटी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या. दगाफटका झाला तर पुन्हा आक्रमक होणार असल्याचा इशाराही गोटेंनी दिला. भाजपमध्ये गुंडांना प्रवेश दिल्याच्या मुद्द्यावर अनिल गोटेंनी शरसंधान साधलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अपमान करणाऱ्या लोकांना पक्षात स्थान दिले जात असल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. आपण धुळ्याच्या महापौरपदाची निवडणूक लढवणार असल्याबाबत धुळ्यातील शिवतीर्थ चौकातील जाहीर सभेत स्वत: अनिल गोटे यांनी सांगितलं होतं. धुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या भाजपच्या पहिल्याच जाहीर सभेत धुळे भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली होती. बॅनरवरुन शहराचे आमदार अनिल गोटेंचाच फोटो गायब होता. याचाच जाब विचारण्यासाठी समर्थकांना घेऊन आमदार गोटे सभास्थळी पोहोचले. फोटोवरुन नाराजी खरंतर गोटेंना माझा फोटो का वगळला, याचा जाब भरसभेत विचारायचा होता. मात्र आधी दानवे आणि त्यानंतर गिरीश महाजनांनी त्यांना रोखलं. मात्र त्यामुळे कार्यकर्ते चवताळले आणि त्यांनी थेट खुर्च्यांचीच मोडतोड सुरु केली. भाजपला घरचा आहेर शिवतीर्थ चौकातील आमदार अनिल गोटे यांच्या सभास्थळी लावलेल्या बॅनरवर संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, तसंच रोहयो, पर्यटन मंत्री जयकुमार रावल या तिघांच्या फोटोला स्थान नव्हते. या सभेत आमदार अनिल गोटे यांनी मोदींच्या नोटाबंदी निर्णयाबाबत परखड मत मांडत भाजपला घरचा आहेर दिला. कोण आहेत अनिल गोटे  संपूर्ण नाव - अनिल उमराव गोटे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक-  1965 जनसंघ (भाजप) . 1971-1999 दैनिक लोकसत्ता (पत्रकार ) 1974 मध्ये जनसंघ संघटन मंत्री असताना 14 नगरसेवक तत्कालीन धुळे नगरपालिकेत निवडून आणले 1979-1988 शेतकरी संघटना 1988-1993 देवीलालजी माजी उपपंतप्रधान यांच्यासोबत काम 1993 स्वतःचा समाजवादी जनता पार्टी महाराष्ट्र पक्ष स्थापन 1998 - समाजवादी जनता पार्टी महाराष्ट्र या पक्षाचे नाव बदलून लोकसंग्राम केलं 1999- 2004 स्वतः च्या लोकसंग्राम पक्षाच्या माध्यमातून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले 2009 ते 2014 - आमदार (दुसरी टर्म ) (पक्ष -लोकसंग्राम ) 2014 मध्ये भाजप पक्षात प्रवेश, 2014 ते आजपर्यंत भाजप आमदार (तिसरी टर्म)

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget